Mapusa Fish Market: म्हापसा मासळी मार्केटची अधिकाऱ्यांकडून पुन्हा पाहणी, नियमांच्या पालनाची पडताळणी; पालिकेने मागितली 15 दिवसांची मुदत

Mapusa: बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा मासळी संकुलाची पुन्हा एकदा संयुक्त पाहणी करण्यात आली.
Mapusa Fish Market
Mapusa Fish MarketDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा मासळी संकुलाची पुन्हा एकदा संयुक्त पाहणी करण्यात आली. ज्यामध्ये नियमांचे पालन तपासण्यात आले. यावेळी म्हापसा नगरपालिकेने अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांचे पालन करण्यासाठी १५ दिवसांचा वेळ मागितला आहे.

बार्देश तालुकास्तरीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, म्हापसा मासळी मार्केटची संयुक्त पाहणी करण्यात आली. ही पाहणी उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांच्या देखरेखीखाली झाली. यावेळी म्हापसा नागरी आरोग्य केंद्राचे अधिकारी दिनेश परब, पालिका अभियंता ऑगस्टिनो मिस्किटा, अभियंता विशांत नाईक, गोवा कॅनचे रोलँड मार्टिन्स आणि आसगाव ग्राहक मंचचे ओवेन ब्रागांझा उपस्थित होते.

पाहणी दरम्यान, मासळी बाजारात टाकलेल्या बांधकाम साहित्याबाबत पालिकेला विचारणा करण्यात आली व ते साहित्य हटवण्यास सांगितले. याशिवाय, प्रलंबित कामांसंदर्भात जीसुडाशी संपर्क साधण्यासही पालिकेला सांगण्यात आले. पालिका अभियंता विशांत नाईक यांनी माहिती दिली की, जीसुडासोबत एक संयुक्त बैठक झाली असून त्यांना प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे. तसेच मार्केटमध्ये पाण्याची योग्य सोय नसल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आणि पालिकेला उपाययोजना करण्यास सांगितले.

Mapusa Fish Market
Goa News: पाणीपुरवठ्यावर आता 'स्मार्ट' नजर! गळती रोखण्यासाठी रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टीम; मंत्री फळदेसाई यांची माहिती

गोवा कॅन’चे रोलँड मार्टिन यांनी बाजाराच्या स्वच्छतेच्या वेळापत्रकाबाबत उपस्थित केलेल्या चिंतेवर उत्तर देताना, अभियंता नाईक यांनी सांगितले की, बाजाराची स्वच्छता दररोज सकाळी आणि संध्याकाळी केली जाते. पालिका एका संस्थेद्वारे बाजाराची सखोल स्वच्छता करण्याची योजना आखत आहे. त्यांनी मार्टिन्स यांना असे आश्वासनही दिले की, स्वच्छतेचे वेळापत्रक आणि संबंधित व्यक्तीचा संपर्क क्रमांक बाजारात प्रदर्शित केला जाईल.

‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकरच’

सांडपाणी गटारात आणि पुढे तार नदीत सोडण्याबाबतच्या चिंतेवर उत्तर देताना, पालिका अभियंता नाईक यांनी माहिती दिली की, आम्ही बाजाराच्या कामकाजासाठी लवकरच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची योजना आखत आहोत, जो सांडपाण्यावर प्रक्रिया करेल.

Mapusa Fish Market
Goa Restaurants Sealed: चार विनापरवाना रेस्टॉरंटना टाळे, जिल्हा प्रशासनाची कारवाई; हरमलात एका आस्थापनावर बडगा

‘पालिकेचे काम असमाधानकारक’

माध्यमांना उत्तर देताना डॉ. दिनेश परब म्हणाले की, गटारांमध्ये पाणी सोडण्याबाबत, तसेच स्वच्छता आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे आणि पालिका त्यावर काम करत आहे. परंतु ते अद्याप समाधानकारक नाही. पालिकेने नियमांचे पालन करण्यासाठी १५ दिवसांची मुदत मागितली आहे, त्यामुळे मी उपजिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यावर चर्चा करून पुढील कार्यवाहीचा निर्णय घेईन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com