Goa News: पाणीपुरवठ्यावर आता 'स्मार्ट' नजर! गळती रोखण्यासाठी रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टीम; मंत्री फळदेसाई यांची माहिती

Goa Winter Session Breaking News: जाणून घ्या गोव्यातील हिवाळी विधानसभा अधिवेशनाबद्दल माहिती आणि राज्यातील इतर महत्वाच्या घडामोडी
Subhash Phaldesai
Subhash PhaldesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पाणीपुरवठ्यावर आता 'स्मार्ट' नजर! गळती रोखण्यासाठी रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टीम; मंत्री फळदेसाई यांची माहिती

राज्यातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग आता 'स्मार्ट मॉनिटरिंग सिस्टम' (Smart Monitoring System) लागू करत असल्याची माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. या अत्याधुनिक प्रणालीमुळे पाणीपुरवठ्याचे रिअल-टाइम (थेट) निरीक्षण करणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे जलवितरण जाळ्याचे कार्यक्षमता वाढेल आणि कुठल्याही भागातील पाण्याची गळती तातडीने शोधून ती दुरुस्त करण्यास मदत होईल. "पाण्याचा अपव्यय टाळणे आणि वितरण व्यवस्थेत सुधारणा करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे," असे मंत्र्यांनी नमूद केले. यामुळे नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

मतदार यादीतून मृतांची नावे वगळण्यासाठी 'ऑटोमॅटिक' यंत्रणा राबवा; आमदार संकल्प आमोणकर यांची मागणी

मृत्यूपश्चात नोंदणी होऊनही मतदार यादीतून मृत व्यक्तींची नावे वेळेवर कमी होत नसल्याच्या गंभीर मुद्द्याकडे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी विधानसभेचे लक्ष वेधले. मतदार यादीतील या त्रुटींमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सभागृहात बोलताना आमोणकर यांनी निवडणूक आयोगाच्या 'स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन' (SIR) प्रक्रियेचे कौतुक केले. मात्र, या प्रक्रियेत अजूनही काही त्रुटी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अनेकदा मृत्यूची अधिकृत नोंदणी होऊनही संबंधित व्यक्तीचे नाव वर्षानुवर्षे मतदार यादीत कायम राहते. याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी नमूद केले.

विश्वजीत-युरींत जुंपली!

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला अ‍ावश्यक त्या सर्व सुविधा देणार. तज्ञ डॉक्टरांच्या भरतीसह साधनसुविधा उभारण्याची प्रक्रिया सुरू : विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

* विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राणेंना घेरले. समस्यांमुळे दरवर्षी १५ हजार रुग्णांचे गोमेकॉत स्थलांतरण होत असल्याचा दावा

"युनिटी मॉल रद्दच करा!"; 'आप'चे नेते चिंबल ग्रामस्थांसह विधानसभेवर धडकले

चिंबल येथील टोय्यर तलावाजवळ होणाऱ्या 'युनिटी मॉल' प्रकल्पाविरोधातील लढा आता अधिक तीव्र झाला आहे. आज आम आदमी पार्टीच्या (AAP) प्रमुख नेत्यांनी चिंबलच्या ग्रामस्थांसोबत गोवा विधानसभेवर भव्य मोर्चा काढला. सत्र न्यायालयाने प्रकल्पाचा बांधकाम परवाना रद्द केल्यानंतर, आता हा प्रकल्प कायमचा मोडीत काढावा, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली.

"न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या नावाखाली सरकारची पळवाट"- विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज विधानसभेत सरकारवर गंभीर आरोप केले. राज्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा टाळण्यासाठी सरकार 'न्यायप्रविष्ट' (Sub-judice) प्रकरणांचे कारण पुढे करत असल्याचे त्यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com