Mapusa News : देश, राज्य कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले: रमाकांत खलप

Mapusa News : पणजीतील मळा येथे रविवारी प्रचारावेळी बोलताना खलप म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत देशाने विपरित दिशेने वाटचाल केली आहे.
Ramakant Khalap
Ramakant KhalapDainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा, भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे राज्य आणि देश मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे उत्तर गोवा लोकसभेचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी केली.

पणजीतील मळा येथे रविवारी प्रचारावेळी बोलताना खलप म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत देशाने विपरित दिशेने वाटचाल केली आहे.

''राज्यावर ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. गोव्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. हीच स्थिती देशाची आहे. डॉलर-रुपयाची तुलना करून बघा. गेल्या दहा वर्षांत काय घडले? आपला देश कुठे पोहोचला आहे, याचे ते द्योतक आहे. भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या घोषणा पुरेशा नाहीत.

म्हापसा येथे जाहीर सभा घेण्याच्या भाजपच्या गैरकारभारावरही त्यांनी टीका केली.

म्हापसा मार्केटमधील विक्रेते नाराज आहेत. भाजपने मार्केटजवळ मोठी जाहीर सभा घेतली आणि त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

खलप म्हणाले की, सध्याचे सरकार वाढत्या बेरोजगारीबाबत उदासीन आहे. मी राज्य सरकारमध्ये आयटी मंत्री असताना पणजी स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ‘स्मार्ट स्टेट’ तयार करण्याचे स्वप्न आम्ही पाहिले होते.

Ramakant Khalap
UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आदींची परिषद आम्ही स्थापन केली होती. आम्ही यावर काम सुरू केले होते, पण सरकारने ही योजना फेटाळून लावली. आम्ही आमच्या गोव्यातील लोकांसाठी आयटी क्षेत्रात रोजगार निर्माण करण्याची योजना आखली होती.

काँग्रेस पक्ष, रमाकांत खलप, आपला भाई जिंकून दिल्लीला जावा, अशी प्रत्येकाची इच्छा दिसते, हीच इथली भावना प्रचारावेळी जाणवली आहे. मार्ग मोकळा आहे. स्पर्धा कठीण नाही. आम्ही पुढे जात आहोत. विद्यमान खासदारांच्या ५ कार्यकाळांबद्दल जेवढे कमी बोलले तेवढे चांगले. हुकूमशाही लादणाऱ्यांना आपण त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि लोकशाही वाढू दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com