Mapusa City: निकृष्ट रस्त्यांसोबतच 'हा' प्रश्न आलाय ऐरणीवर, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त

चेंबर फुटल्याने दुर्गंधीयुक्त रस्त्यावरून पाणी
Mapusa News
Mapusa News Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापशातील काही प्रभागांमध्ये पाच वर्षांपूर्वी मलनिस्सारण प्रकल्पाचे काम करण्यात आले होते, आणि यासाठी चेंबर्स बांधण्यात आले होते. त्या चेंबर्समधून सध्या मुसळधार पडत असलेल्या पावसाचे पाणी व घाण पाणी अंगावर उडत आहे.

दरम्यान, भूमिगत केबलच्या कामासाठी रस्त्यांचे खोदकाम झाले आहे. परंतु बुजवल्याने खड्डे न बुजवल्याने रस्त्यांच्या दुर्दशेत भर पडली असून लोकांचा संताप वाढला आहे. सध्या म्हापसा मारुती मंदिराजवळच्या सरकारी शाळेलगतचा चेंबर फुटल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वहात आहे. त्यामुळे रहिवाशांत संताप आहे. हे घाण पाणी तिथून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावरही उडते.

Mapusa News
Goa Monsoon Update: मोसमी पावसाला दमदार सुरूवात; शेती कामांना वेग

रस्ते गेले खड्ड्यात; चालकांत संताप

भूमिगत केबलच्या कामामुळे म्हापशातील सर्व रस्त्यांचे खोदकाम झाले आहे. परंतु केबलचे काम अर्धवट राहिले व रस्ता न बुजवल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तसेच या पावसामुळे ठिकाणी सर्वत्र चिखल पसरला आहे. त्यातून वाहन चालकांना वाहन चालवणे मुश्किल होत असल्याने वाहनचालकांत संताप आहे.

Mapusa News
Goa Monsoon Update: राज्यभरात सुखावणारी संततधार

म्हापशातील भूमिगत वीज वाहिनीचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.त्यानंतर संपूर्ण रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे. भूमिगत वीज वाहिनीचे काम कंत्राटदराला दोन वर्षासाठी दिलेले आहे. पुन्हा पुन्हा रस्त्यांचे खोदकाम होत असल्याने पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करणे शक्य नव्हते. नोव्हेंबरनतंर डांबरीकरण होईल.

ज्योशुआ डिसोझा, आमदार

Mapusa News
Goa Crime: धक्कादायक! माय-लेकाला नदीत ढकलून त्यांनी स्‍वत: घेतला गळफास, 'या' कारणास्तव उचलले शेवटचे पाऊल

सध्या पावसाचे दिवस असतानाही पावसापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण अंतर्गत वीज वाहिन्यांचे काम चालू असल्याचे सांगून त्यावर आमदारांनी आणि पालिकेने दुर्लक्ष केले. पावसाळ्यापूर्वीच रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक होते. खड्डे सिमेंट बुजवताना सकाळी घातलेले सिमेंट संध्याकाळपर्यंत नाहीसे होते.

सुदेश तिवरेकर, वाहनचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com