Mapusa Crime: म्हापशात राजरोसपणे सुरुये वेश्याव्यवसाय; पुणे, मुंबई, सांगलीतील महिलांचा समावेश, पोलिसांचे दुर्लक्ष

Mapusa Crime News: गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधून महिला गोव्यात आल्याचे अर्जने म्हटलंय.
Mapusa Crime: म्हापशात राजरोसपणे सुरुये वेश्याव्यवसाय; पुणे, मुंबई, सांगलीतील महिलांचा समावेश, पोलिसांचे दुर्लक्ष
Mapusa Bus Stand
Published on
Updated on

म्हापसा: गोव्यात रेड लाईट एरिया नसला तरी बेकायदेशीरपणे विविध ठिकाणी सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच्या घटना पोलिसांच्या माध्यातून उघडकीस येत असतात. पण, म्हापशात राजरोजसपणे वेश्याव्यवसाय सुरु असून, त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अर्ज या सामाजिक संस्थेने म्हापसा वेश्याव्यवसायचे केंद्र बनत असल्याचा दावा केला आहे.

'म्हापसा बसस्थानकावर दररोज २० ते ३० महिला ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. बसस्थानकावर या महिला उभ्या असतात आणि काही अंतरावरुन त्यांच्यावर दलाल लक्ष ठेवत असतात. काही समस्या आल्यास हे दलाल त्यांना मदत करतात', असे अर्जने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

या महिला बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या घरातून येतात. गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधून महिला गोव्यात आल्याचे अर्जने म्हटलंय.

Mapusa Crime: म्हापशात राजरोसपणे सुरुये वेश्याव्यवसाय; पुणे, मुंबई, सांगलीतील महिलांचा समावेश, पोलिसांचे दुर्लक्ष
Mann Ki Baat: इच्छा असो वा नसो, सरकारी अधिकाऱ्यांना ऐकावी लागणार मोदींची 'मन की बात'; गोवा सरकारचा आदेश

पुण्यातील बुधवार पेठ, मंबईतील कामाठीपुरा, सांगलीसह महाराष्ट्रातील इतर भाग आणि पश्चिम बंगालमधून या महिला गोव्यात येतात. म्हापसा बस स्थानकावर उभ्या असलेल्या या महिलांकडे ग्राहक येतात आणि हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हा व्यवसाय सुरु असतो.

महिलांवर लक्ष ठेवणारे दलाल संभाव्य धोक्याची सूचना देऊन वेळेप्रसंगी त्यांची सुटका करतात, असे अर्जने म्हटले आहे. पोलिसांनी दलाल, हॉटेल आणि या पैशांवर उड्या मारणाऱ्यांवर कारवाई केल्यास हा अवैध वेश्याव्यवसाय बंद करता येईल, असा उपायही अर्जने सुचवला आहे.

Mapusa Crime: म्हापशात राजरोसपणे सुरुये वेश्याव्यवसाय; पुणे, मुंबई, सांगलीतील महिलांचा समावेश, पोलिसांचे दुर्लक्ष
Porvorim Flyover: 88 पैकी 40 खांबांचे काम पूर्ण! पर्वरी उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर

वेश्याव्यवसायात गुंतलेल्या महिला, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी आणि म्हापसा पोलिसांसोबत अर्जने बैठक घेऊन हा अवैध प्रकार थांबवण्याबाबत चर्चा केली. यातून बाहेर पडणाऱ्या महिलांना रोजगार देखील उपलब्ध करुन दिला जात असल्याचे अर्जने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com