Colvale Jail: कोलवाळ कारागृहात अंमली पदार्थांसह सापडले तब्बल 'इतके' मोबाईल

कैद्यांच्या खोल्यांमध्ये आकस्मिक तुरुंग अधिकाऱ्यांनी टाकला छापा
Colvale Jail
Colvale JailDainik Gomantak

Colvale Jail: कोलवाळ कारागृहातील हाणामारी तसेच मोबाईल व ड्रग्स तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था भेदून आत जात असल्याने नेहमीच चर्चेत राहिले आहे. यावेळीही तुरुंग अधिकाऱ्यांना छाप्यात ४५ मोबाईल्स तसेच गांजा व चरस सापडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोलवाळ कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Colvale Jail
Goa Job : गोव्यात परीक्षा नियंत्रकासह 'या' सहा पदांसाठी मागवले अर्ज

कारागृहात आज अचानक कैद्यांच्या खोल्यांमध्ये आकस्मिक तुरुंग अधिकाऱ्यांनी छापा घातला. या छाप्यात ४५ मोबाईल्स तसेच गांजा व चरस सापडला आहे. ही कारवाई तुरुंग महानिरीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्या निर्देशानुसार केली असली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या मोबाईल संचांमुळे तेसुद्धा चक्रावून गेले आहेत.

यापूर्वीही अनेकदा कारागृहातून ड्रग्स, मोबाईल्स तसेच मद्याच्या बाटल्या, सिगारेट्सही कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी कैद्यांच्या खोल्यांची झडती घेताना सापडल्या आहेत. या कारागृहामध्ये प्रवेशाच्या ठिकाणी तीनवेळा तपासणी होते. दोन ठिकाणी आयआरबी पोलिस तैनात आहेत, तर तिसऱ्या प्रवेशद्वारावर तुरुंगरक्षक असतात. तरीही मोबाईल व ड्रग्स कारागृहात जाते, हे न उलगडणारे कोडे बनले आहे.

Colvale Jail
Babu Ajgaonkar: दादागिरी खपवून घेतली जाणार नाही; भाजप नेत्याचा बाबू आजगावकरांना इशारा

कारागृहाच्या प्रमुखपदी सरकारी अधिकाऱ्याची वर्णी लावण्याऐवजी यावेळी सरकारने पोलिस खात्याचे आयपीएस अधिकारी बॉस्को जॉर्ज यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी ताबा घेतल्यापासून कारागृह अधिकारी व तुरुंग रक्षकांमध्ये शिस्त आणली आहे. मात्र, कैद्यांना कोलवाळ कारागृहात मोबाईल वा ड्रग्सपुरवठा करण्यामागे हात असलेल्यांचा शोध घेण्यासाठी ते कारागृहात अनेक सुधारणा करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com