Manual Scavenging: हाताने मैला साफ करण्याच्या प्रथेपासून गोवा मुक्त; सरकारतर्फे फळदेसाईंनी केली मोठी घोषणा ..

Manual Cleaning Ban Goa: राज्य सरकारने आज गोवा हे भंगीमुक्त राज्य झाल्याचे जाहीर केले आहे.
Goa sanitation
Goa sanitationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्य सरकारने आज गोवा हे भंगीमुक्त राज्य झाल्याचे जाहीर केले आहे. मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत समाजकल्याण मंत्री, सुभाष फळदेसाई यांनी ही घोषणा केली. त्यांनी जाहीर केले आहे, की गोवा राज्य आता हाताने मैला साफ करण्याच्या प्रथेपासून मुक्त झाले आहे. राज्याने संपूर्णपणे यांत्रिकीकरणावर भर दिला असून, सांडपाणी व्यवस्थापन पूर्णतः यंत्रांच्या साहाय्याने केले जाते.

ही घोषणा दोन्ही जिल्ह्यांमध्ये अस्वच्छ शौचालये व हाताने मैला साफ करणाऱ्या मजुरांचा शोध घेण्यासाठीच्या सर्वेक्षणावर आधारलेले आहे. २०१४ मध्ये अशा कार्यात जीव गमावलेल्या तीन कामगारांच्या कुटुंबीयांना ३८.४० लाख रुपयांचे नुकसान भरपाई म्हणून अनुदान दिले आहे.

Goa sanitation
GMC Goa: 10 दिवसानंतही गोमेकॉत सर्व्हर समस्या कायम, नोंदणी यंत्रणा विस्कळित; रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप

ही घोषणा राज्यातील स्वच्छता कामगारांसाठी एक महत्वाचे पाऊल ठरले आहेत. गोव्याचे समाजकल्याण मंत्री, सुभाष फळदेसाई यांनी मंगळवारी (दि. ४ फेब्रुवारी) रोजी दिलेल्या माहितीनुसार या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि राज्य आता स्वच्छतेच्या कामासाठी यंत्राचा वापर करणार असल्याचे फळदेसाईंनी सांगितले आहे.

राज्य आणि जिल्हास्तरीय समित्यांनी केलेल्या या सर्वेक्षणांच्या निष्कर्षांवर गोव्याला भंगीमुक्त राज्य झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावर कुणालाही आक्षेप असू नये म्हणून रहिवासी आणि भागधारकांकडून अभिप्राय देखील मागवून घेतले होते, मात्र यात कुणीही गोव्याच्या मैला साफ करण्याच्या प्रथेवर आक्षेप घेतला नाही म्हणून गोवा भंगीमुक्त राज्य बनले आहे.

इतरांप्रमाणे स्वच्छता कामगारांसाठी सुद्धा सुरक्षित आणि सन्माननीय कामाचे वातावरण मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हाताने मैला साफ करण्याच्या प्रथा कायमची बंद करून गोव्याने इतर राज्यांच्यासमोर एक उदाहरण स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com