दहा वर्षांपासून कुडचडे विकासाविना : परब

राज्य सरकारने फक्त खाणी सुरू करणार असे सांगून गेल्या दहा वर्षात लोकांना झुलवत ठेवले. हा व्यवसाय बंद पडल्याने हजारो लोकांना त्रास सहन करावा लागतोय.
Manoj Parab
Manoj ParabDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: गेल्‍या दहा वर्षांत कुडचडे मतदारसंघाचा कोणताच विकास झालेला नाही. आमदार नीलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी फक्त बिगरगोमंतकीयांचाच विकास केला, असा आरोप रिव्‍होल्‍युशनरी गोवन्सचे (RJI) सर्वेसर्वा मनोज परब (Manoj Parab) यांनी तिळामळ येथे झालेल्या जाहीर सभेत केला. विशेष म्‍हणजे या सभेवेळीही जोरदार पाऊस (Rain) पडत होता, तरीही शेकडो कार्यकर्त्यांची उपस्‍थिती होती.

Manoj Parab
Goa: निलेश काब्राल दिल्लीच्या ऊर्जा मंत्र्यांशी चर्चेसाठी सज्ज

राज्य सरकारने फक्त खाणी सुरू करणार असे सांगून गेल्या दहा वर्षात लोकांना झुलवत ठेवले. हा व्यवसाय बंद पडल्याने हजारो लोकांना त्रास सहन करावा लागतोय. पण सरकार खाण अवलंबितांना दुसऱ्या व्यवसायाकडे वळवण्यास अपयशी ठरले व या लोकांवर उपासमारीची वेळ आली, असे परब म्‍हणाले. दरम्‍यान, पाऊस असूनही सभेला शेकडो लोकांनी हजेरी लावल्‍याबद्दल परब यांनी त्‍यांचे आभार मानले. यावेळी आदित्य देसाई हजर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com