देशात येत्या काळात चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Elections) होणार आहेत. यामुळे मोफत विजेशिवाय 24 तास विजेचा प्रश्न चर्चेत आहे. आम आदमी पार्टी प्रत्येक राज्यात दिल्लीची विनामूल्यं वीज आणि 24 तास विजेचा मुद्दा वापरत आहे. पुढच्या वर्षी गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुका (Elections) होणार आहेत तिथे आम आदमी पार्टी देखील लढत आहे. या विषयावर 26 जुलैला दुपारी 3 वाजता ऊर्जा मंत्री सत्यंदर जैन (Satyendra Jain) आणि गोव्याचे (Goa Energy Minister Nilesh Cabral) ऊर्जा मंत्री निलेश काब्राल (Nilesh Cabral) यांच्यात चर्चा सुरू आहे. या वादावर गोव्याचे ऊर्जा मंत्री म्हणाले, "मी ऊर्जा मंत्री असल्याने दिल्ली येथे माझ्या सहकाऱ्यांना यायचे आहे आणि मला जे काही विचारायचे आहे ते विचारू शकता." काब्राल पुढे म्हणाले की , प्रश्न-उत्तर 26 जुलै रोजी दुपारी 3 वाजता होणार. मी त्यांच्या प्रश्नाची वाट पाहणार आणि त्याना उत्तर देणार. तसेच मी विचारलेल्या प्रश्नाचे देखील त्यांना उत्तर द्यावे लागेल.
* भाजपावर केला आरोप
सत्येंद्र जैन यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करून चर्चेसाथी गोव्याला जाण्याची घोषणा केली होती. जैन म्हणाले होते की जेव्हापासून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा 300 युनिट फ्री वीज देण्याचे वचन दिले होते, तेव्हापासून भाजपा अशी अफवा पासरवित आहे.
* सत्येंद्र जैन रविवारी गोव्यात रवाना होतील
जैन म्हणाले की, उद्या म्हणजेच 25 जुलै रोजी गोव्याला जातील. जैन यांनी सांगितले की , नीलेश काब्राल यांनी त्यांना 26 जुलै रोजी चर्चेसाथी आमंत्रित केलेले आहे. याची माहिती ट्विट करून देण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गोव्यातील एका टीव्ही वृतवाहिनीने मंगळवारी म्हणजेच 20 जुलै रोजी ट्विट करून गोव्याचे ऊर्जा मंत्री नीलेश काब्राल असे सांगितले आहे की जर आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा दिल्लीचे ऊर्जामंत्री असते तेर त्यांनी समोरसमोर चर्चेसाठी बसले असते. वादाचा मुद्दा असा आहे की, मला त्यांच्यासोबत चर्चेसाठी बसायचे नाही. दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्यंदर जैन यांनी नीलेश काब्राल यांच्या या व्यक्तव्यावर ट्विट करून प्रतिउत्तर दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.