अरविंद टेंगसेंच्‍या ‘भाई’ फोटो प्रदर्शनाद्वारे मनोहर पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा

मनोहर पर्रीकर यांची आज जयंती, त्यानिमित्त पत्रकार अरविंद टेंगसे यांनी कॅमेऱ्यातून टिपलेल्या त्यांच्या विविध छटा दाखविणाऱ्या फोटोंचे प्रदर्शन रवींद्र भवन मडगावच्या कृष्णकक्षात आयोजित केले आहे.
Manohar Parrikar birth anniversary photo exhibition in Goa
Manohar Parrikar birth anniversary photo exhibition in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी आपले श्रेष्ठत्व कृतीद्वारे सिद्ध केले आहे . पर्रीकर हे वक्ते नव्हते, पण आपल्या कृती व कार्याद्वारे त्यांनी आपला मोठेपणा, हुशारी दाखवली, असे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांनी केले आहे . मनोहर पर्रीकर यांची आज जयंती, त्यानिमित्त पत्रकार अरविंद टेंगसे यांनी कॅमेऱ्यातून टिपलेल्या त्यांच्या विविध छटा दाखविणाऱ्या फोटोंचे प्रदर्शन रवींद्र भवन मडगावच्या कृष्णकक्षात आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक (Damu Naik), सदस्य सचिव संध्या कामत, जिल्हा परिषद सदस्य उल्हास तुयेकर, पर्रीकर यांचे सुपुत्र अभिजात पर्रीकर यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.(Manohar Parrikar birth anniversary photo exhibition in Goa)

पर्रीकरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकारणी झालो. त्यांच्याकडून अनेक अनुभव मिळाले, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, असे माजी आमदार दामू नाईक यांनी सांगितले. पत्रकार टेंगसे यांच्याकडे पर्रीकर यांचे 1500 ते 2000 फोटो आहेत. त्यातील त्यांनी काही निवडक फोटो प्रदर्शनात ठेवले आहेत. हे प्रदर्शन 13, 14 व 15 असे तीन दिवस लोकांसाठी खुले असेल.

याच कार्यक्रमात बोलताना आपण विज्ञाननिष्ठ असल्याचे पर्रीकर यांनी स्वत: कधीच सांगितले नाव्‍हते. पण, ते त्‍यांनी आपल्या कर्तृत्वाद्वारे सिद्ध करून दाखवले. पर्रीकर यांनी गोव्यासाठी केलेल्या कार्याचे मूल्यमापन होण्यास थोडा विलंब लागेल. पण, ते किती मोठे असेल याचा अंदाज तेव्हाच येईल. पर्रीकर यांचे कार्य गोव्याच्या मातीसाठी होते अशी भावना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केली आहे.

Manohar Parrikar birth anniversary photo exhibition in Goa
Goa: पिळगावात रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com