Manohar Airport: मोपा विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, तसेच योग्य दरात त्यांना आपल्या पसंतीच्या वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल, यासाठी गोवा सरकारकडून गोवा टॅक्सी ॲप सुरू करण्यात आले आहे. परंतु ॲप सुरू होऊन अवघ्या काही दिवसांत वादाच्या भोवऱ्यात सापडले.
मोपा ते बाणावली प्रवास केलेल्या प्रवाशांना चार हजार शुल्क लागू झाल्याचे बिल व्हायरल झाले आहे. त्यात कदंब बस सेवा देखील महाग असल्याने यात प्रवाशांची कोंडी झाली आहे.
गोवा टॅक्सी ॲप सेवा सुरू झाल्यास सवलतीच्या दरात प्रवास करता येईल, असा समज प्रवाशांनी केला होता. परंतु लगेच हा गैरसमज होता, असे त्यांच्या लक्ष्यात आले आहे. यावरून आता वेगळा वाद निर्माण झाला असून व्हायरल झालेले बिल हे अधिसूचित केलेल्या दरानुसार होते, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच ॲप तयार केलेल्या गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला (जीएएल) यात सुधारणा करण्याची सूचना दिल्याचे खंवटे यांनी सांगितले आहे. मात्र गोवा ॲपच्या मूळ उद्देशावर आता प्रश्न निर्माण झाला आहे.
पणजी ते मडगाव कदंब महामंडळाच्या शटल सेवेसाठी प्रवास शुल्क 50 रुपये आहे, परंतु मोपा ते मडगाव मार्गावर 400 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.
एक किंवा दोन जणांसाठी हे शुल्क परवडणारे असले तरी मोठ्या गटात आलेल्यांसाठी हे टॅक्सीमध्ये गेल्याप्रमाणे होणार आहे.
दहा मिनिटांच्यावर राहिल्यास पार्किंगशुल्क 500 रुपये द्यावे लागेल.
विमानतळावर गर्दी होऊ नये, यासाठी काही नियम केले गेले आहे. मोपा विमानतळावर देखील हेच नियम लागू केले जातील. विमानतळावर प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा नेण्यासाठी येणाऱ्या खासगी आणि व्यावसायिक वाहनांना पार्किंग शुल्क अनिवार्य केले आहे.
प्रवाशांना नेण्यासाठी येणाऱ्या खासगी चारचाकीला पहिली 5 मिनिटे मोफत आहेत. 5-10 मिनिट थांबल्यास 50 रुपये आणि 10 मिनिटापेक्षा अधिक वेळेला 500 रुपये शुल्क आकारले जाईल.
तर नेण्यासाठी येणाऱ्या व्यावसायिक चारचाकीला पहिल्या 5 मिनिटांसाठी 50 रुपये आणि 5 मिनिट ओलांडल्यास 500 रुपये शुल्क आहे. बस आल्यास प्रत्येक 30 मिनिटांसाठी एक हजार आकारले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.