Maan Ki Baat: ‘मन की बात’ लोकसंवादाचा सकारात्मक सोहळा- पी. एस. श्रीधरन पिल्लई

पद्म प्राप्त सद्‍गुरू ब्रह्मेशानंद, शंखवाळकर, खेडेकर यांची उपस्थिती
Maan Ki Baat
Maan Ki BaatDainik Gomantak
Published on
Updated on

Maan Ki Baat ‘मन की बात’ हा लोकसंवादाचा सकारात्मक सोहळा आहे,असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे  राजभवनावर आज  विशेष प्रसारण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

सद्‍गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, ब्रह्मानंद शंखवाळकर, विनायक खेडेकर, तसेच सागर नाईक मुळे, रांगोळी कलाकार  गुरुदत्त वांतेकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात या सर्व उपस्थित पद्म विजेत्यांचा आणि पंतप्रधानांनी ‘मन की बात’ च्या मागील भागात उल्लेख केलेल्या गोवेकरांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचा देशभर विशेषत: आरोग्य, स्वच्छता आणि जलसंधारण या क्षेत्रांवर लक्षणीय परिणाम झाल्याचे राज्यपाल म्हणाले. राजकारण, जात,  पंथ यांच्या पलीकडे जाणाऱ्या या कार्यक्रमाचा बिगर राजकीय दृष्टीकोन, या कार्यक्रमाला लाभलेल्या यशातला एक महत्त्वाचा घटक आहे, अशा शब्दात त्यांनी मन की बात ची प्रशंसा केली.

या कार्यक्रमात, पारंपरिक भारत आणि त्याची मूल्ये यांचं प्रतिबिंब पडलेले दिसते.   देशाच्या विकासाला चालना देण्यात या कार्यक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

लोक संपर्काचा हा   भारतातील सर्वात मोठा प्रसारण कार्यक्रम आहे. राज्यपाल म्हणाले की, ‘मन की बात’ हे पारंपरिक भारताचे प्रतिबिंब आहे.

Maan Ki Baat
Ramesh Tawadkar: सभापतींवरील आरोपांची चौकशी करा- गिरीश चोडणकर

निवडक प्रसंगांचे प्रदर्शन

केंद्रीय संपर्क विभागाने आजच्या या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून,  ‘मन की बात आणि आझादी का अमृत महोत्सव’ या नावाने प्रदर्शनही आयोजित केले होते.  या प्रदर्शनात,  कार्यक्रमाच्या आजवरच्या 100 भागांमधील प्रेरणादायी क्षण तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील निवडक प्रसंग मांडण्यात आले.

या प्रदर्शनात  एका ध्वनिमुद्रण कक्षाची प्रतिकृती उभारण्यात आली, जिथे पाहुण्यांना छायाचित्र काढण्याची संधी देण्यात आली होती. आकाशवाणी पणजी मधील गतकाळातील पुरातन रेडिओ उपकरणं, तसेच संच मांडण्यात आले होते.  

ध्वनिमुद्रण कक्षाच्या प्रतिकृतीच्या आत, या पुरातन उपकरणांसह स्वतःचे छायाचित्र काढण्यासाठी उपस्थितांनी छायाचित्र स्थळांवर  गर्दी केली होती. या उपक्रमालाही उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

Maan Ki Baat
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेल दरात किरकोळ घट, जाणून घ्या आजचे दर

‘मन की बात’ला राज्यात मंत्री, आमदारांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शंभराव्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे प्रसारण रविवारी सर्व प्रसारमाध्यमांवरून करण्यात आले. त्यास राज्यभरात भाजपच्या सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनीही ती ऐकली.

प्रदेश भाजपतर्फे शंभराव्या भागाच्या बुथनिहाय प्रसारणाचा उपक्रम राबविला.बुथ प्रमुखांना गर्दीची छायाचित्रे पाठविण्याचे भाजपने आदेश दिले आहेत.

मन की बात मधील ‘बेटी बचाव' या व मुलीसोबत सेल्फी उपक्रमाचा उल्लेख कौतुकास्पद ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले. ‘मन की बात' घरोघरी पाहिला जात असल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांतून शेअर केली.

Maan Ki Baat
Panjim News: पणजीतील मलनिस्सारणाचे काम ठप्प! उत्पल पर्रीकर म्हणाले..

मोदींच्या विचाराने प्रभावित ः सिक्वेरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ चा 100 वा भाग आज प्रसारित झाला. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी कुडतरी मतदारसंघातील मनोरा राय येथील बुथ क्रमांक दहामधून हा कार्यक्रम पाहिला.

आपण पंतप्रधान मोदी यांनी मांडलेल्या विचारांनी प्रभावित झाल्याचे सिक्वेरा यांनी सांगितले. हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. ‘मन की बात’ हा कार्यक्रम म्हणजे पंतप्रधान आपल्या मनातील विचार लोकांना सांगतात.

एवढ्यावरच थांबत नसून ते लोकांपर्यंत पोहोचतात, त्यांच्याकडून त्यांचे विचार जाणून घेतात व नंतर त्याचे पालन करतात, ही एकदम चांगली गोष्ट असल्याचे सिक्वेरा यांनी सांगितले.

लोकंबरोबर थेट चर्चा करणारे हे देशातील पहिलेच पंतप्रधान असल्याचेही सिक्वेरा यांनी सांगितले. कुडतरी मतदारसंघातील भाजपचे एसटी समाजाचे नेते ॲंथनी बार्बोजाही त्यांच्यासमवेत होते. बार्बोजा यांनी सांगितले, की ‘मन की बात’च्या या 100 व्या भागाने सर्वांनाच आनंद झालेला आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com