Ramesh Tawadkar: सभापतींवरील आरोपांची चौकशी करा- गिरीश चोडणकर

दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करा
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

Ramesh Tawadkar विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांच्यावर जंगलतोडीला प्रोत्साहन देण्याचा आरोप हा गंभीर प्रकार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

ते म्हणतात, जनार्दन भंडारी आणि विकास भगत या दोन्ही काणकोण येथील स्थानिकांनी रमेश तवडकर यांनी आपल्या सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पदांचा वापर करून जंगलातील झाडांचा अवैध वापर केल्याचा आरोप केला होता.

Ramesh Tawadkar
Rohan Khaunte: गोव्यात लवकरच नवं पर्यटन धोरण राबवणार; 'या' असतील नव्या योजना

तवडकर यांनी या झाडांचा वापर कोणत्याही कारणासाठी केला असेल, पण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे आवश्‍यक आहे. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे.

घटनात्मक पदाचा वापर करून वनक्षेत्रातील झाडाचा गैरवापर आणि सरकारी अधिकाऱ्यांचाही या गुन्ह्यात सहभाग करून घेणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

भाजप करीत असलेल्या दादागिरीमुळे सरकारी अधिकाऱ्यांनाही या पक्षाच्या नेत्यांचे बेकायदेशीर आदेश आणि कृत्यात सहभागी व्हावे लागत आहे. झाडांच्या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी त्यांनी केली आहे.

Ramesh Tawadkar
Goa Forward Party: मुख्यमंत्री सरल पगार योजना धोकादायक

कायद्याला सामोरे जावे!

कायदा करणारी व्यक्ती कायदा मोडू शकत नाहीत आणि यासाठी तवडकर यांनी सभापतिपदाचा राजीनामा देऊन कायद्याला सामोरे जावे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावे.

राज्यात जुगार व खंडणीचे प्रकार सुरू असल्याचे सांगून तवडकर यांनी आपल्याच सरकारचा पर्दाफाश केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गेल्या एक दशकापासून राज्यात भाजपचे सरकार असूनही गोव्यात जुगार व खंडणी सुरू असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com