Mango Rate : मडगावात मानकुराद म्हणून हापूस आंब्‍यांची विक्री; १००० ते १२०० रुपये डझन

Mango Rate : पुढील पंधरा दिवसांत तिसऱ्या मोहराचे आंबे बाजारात येतील व ते मोठ्या संख्‍येने असतील, असे एका घाऊक विक्रेत्याने सांगितले. दरम्‍यान, बाजारात हापूस आंब्यांची आवक मात्र वाढलेली आहे.
 Mango in Market
Mango in MarketDainik Gomantak

Mango Rate :

सासष्टी, मडगावात यंदा आंब्यांची आवक अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. मानकुराद आंब्यांच्या झाडांना जो पहिला मोहर आला होता, तो मध्यंतरी पाऊस पडल्याने गळून पडला. आता जे मानकुराद आंबे बाजारात येत आहेत, ते दुसऱ्या मोहराचे आहेत.

पुढील पंधरा दिवसांत तिसऱ्या मोहराचे आंबे बाजारात येतील व ते मोठ्या संख्‍येने असतील, असे एका घाऊक विक्रेत्याने सांगितले. दरम्‍यान, बाजारात हापूस आंब्यांची आवक मात्र वाढलेली आहे.

मानकुरादला ‘आंब्यांचा राजा’ असे म्हटले जाते. या आंब्‍यांची चवच न्‍यारी असते. म्‍हणून ग्राहक त्‍यावर तुटून पडतात. पण काही विक्रेते मानकुराद म्हणून हापूस आंबे विकतात, अशी तक्रार एका महिला विक्रेतीने केली. खास करून जे गोव्याबाहेरील लोक आहेत, ते जास्त फसतात, असे दिसून आले आहे.

दरम्‍यान, मडगाव शहरात सर्व बाजूंनी आंब्यांची आवक होते.तेथूनच व नंतर येथूनच पणजी, वास्को, सांगे, वास्को व फोंडा वगैरे भागात विक्रीसाठी नेले जातात, असेही या विक्रेत्याने सांगितले.

मानकुराद १००० ते

१२०० रुपये डझन

सध्‍या हापूस व मानकुराद आंबेच बाजारात जास्त दिसतात. मुसराद, फेर्नांद, मांगीलाल, कुलास व कॉस्ता हे आंब्याचे प्रकार अजूनही बाजारात आलेले नाहीत. सध्‍या आंब्याची किंमत प्रत्येक दिवशी बदलत असते. मानकुराद आंब्यांच्या किमती ५ ते ९ हजार रुपये प्रतिशेकडा अशी आहे. किरकोळमध्ये मानकुराद १००० ते १२०० रुपये प्रतिडझन अशा दराने विकला जात आहे. तर, हापूस आंब्याचा दर १८० रुपये प्रतिकिलो असा आहे. काही विक्रेते ६०० ते ८०० रुपये प्रति डझन असे हे आंबे विकतात.

 Mango in Market
Goa Politics: 'पंतप्रधानांनी संविधानाची हत्या केली, तारीख, वेळ ठरवा मी चर्चेला तयार'; विरियातोंचे मोदींना 'ओपन चॅलेंज'

‘घोटा’ही कमीच; दर २५० रुपये

‘घोटा’ हा आंब्‍याचा प्रकार गोमंतकीयांच्‍या खूपच आवडीचा. या घोटांचे सांसव, अननस घालून तोंडाक किंवा पल्प काढून त्याचे पेय वगैरे केले जाते. मात्र यंदा ‘घोटा’ बाजारात जास्त दिसून येत नाहीत. सध्‍या तरी २५० रुपये प्रतिडझन अशी त्‍यांची किंमत आहे, असे विक्रेत्याने सांगितले.

मानकुराद १००० ते १२०० रुपये डझन

सध्‍या हापूस व मानकुराद आंबेच बाजारात जास्त दिसतात. मुसराद, फेर्नांद, मांगीलाल, कुलास व कॉस्ता हे आंब्याचे प्रकार अजूनही बाजारात आलेले नाहीत. सध्‍या आंब्याची किंमत प्रत्येक दिवशी बदलत असते. मानकुराद आंब्यांच्या किमती ५ ते ९ हजार रुपये प्रतिशेकडा अशी आहे.

किरकोळमध्ये मानकुराद १००० ते १२०० रुपये प्रतिडझन अशा दराने विकला जात आहे. तर, हापूस आंब्याचा दर १८० रुपये प्रतिकिलो असा आहे. काही विक्रेते ६०० ते ८०० रुपये प्रति डझन असे हे आंबे विकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com