Mango Issue : आंबा खाताय ? ...सावधान हापूस 'आंबा' देवगड हापूसच्या नावे विकला जात आहे

Mango Issue : बाजारात रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे
 Mango in Market
Mango in MarketDainik Gomantak

Mango Issue :

पणजी, राज्यात मानकुरात, हापूस, सेंदुरी, केशरी तसेच इतर विविध प्रकारचे आंबा बाजारात विक्रीसाठी आलेले आहेत. मानकुरात हा स्थानिक आंबा सोडल्यास इतर आंबा खरेदी करताना ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे.

राज्यात मानकुरात नंतर हापूस आंब्याला अधिक मागणी असते, त्यातही देवगड हापूस खरेदीला नागरिक अधिक प्राधान्य देतात. परंतु, बाजारात जो हापूस आंबा विकला जात आहे. तो देवगड हापूसच्या नावे विकला जात आहेत.

 Mango in Market
Goa Congress: भाजपचे धोरण 'मिशन टोटल कमिशन'; हाच का मोदींचा विकसीत भारत? खलप यांचा सवाल

राज्यात हापूस ८०० ते ९०० रुपये डझन दराने विकला जात आहेत परंतु दरप्रमाणे उत्कृष्ट प्रतीचा आंबा मिळत नसल्याचे ग्राहक सांगतात. ज्याप्रमाणे हापूस आंब्याला गोडी असते, तसे ते मिळत नाहीत, अनेक आंबे आंबट लागत असल्याने ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे.

नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंब्यांना स्पर्श केल्यानंतर ते मऊ आणि मुलायम असल्याचे जाणवतात. तोच रासायनिकरीत्या पिकलेला आंबा पिवळा आणि कठोर असतो. पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरीत्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर अजिबात चिकटून बसत नाही. हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून तो सहजरीत्या ओळखता येतो.

 Mango in Market
Goa College of Agriculture : गोवा कृषी महाविद्यालयात गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण

कोकणातील हापूस आंब्याची चव अप्रतिम असते. पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. चांगली गुणवत्ता असलेल्या हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुगंध असतो. नैसर्गिकरीत्या गवताच्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्याच्या घमघमाट दूरपर्यंत पसरतो.

इतर भागातून येणारा आंबा जे दिसायला जरी हापूस आंब्यासारखे असले तरी त्याला अजिबात गंध नसतो किंवा कमी प्रमाणात गंध येतो. याचे प्रमुख कारण रासायनिक पद्धतीने आंबे पिकविले जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com