Mandrem VP Sarpanch Amit Sawant
Mandrem VP Sarpanch Amit SawantDainik Gomantak

Mandrem Gambling News: लोकांनी निवडणूकीत घरी बसवले तरी चालेल, पण जुगार बंद करणारच; मांद्रे सरपंचांचा निर्णय

जुगार बंद करण्याच्या मागणीचे निवेदन सावंत यांनी पेडणे पोलिसांत दिले आहे
Published on

Mandrem VP Sarpanch Amit Sawant : जुगारबंदी विरोध केला म्हणून मला सरपंच पदावरून पुढच्या वेळी घरी बसविले तरी चालेल पण आपण मांद्रे गावात पुर्ण जुगार बंद करणार. या संदर्भातील निवेदन पेडणे पोलिसांना देण्यात आल्याची माहिती मांद्रे सरपंच अमित सावंत यांनी दिली आहे.

Mandrem VP Sarpanch Amit Sawant
Goa Assembly Monsoon Session 2023 : 'फ्रॉड' शब्दावरुन मंत्री राणेंची माघार; व्यक्त केली दिलगीरी

"मांद्रे गावात जर जुगार चालू असेल तर तो जुगार पोलिसांनी बंद करावा याबाबतचे निवेदन मी पेडणे पोलिसांत दिले आहे. मांद्रे गावातील जुगार बंद करण्यात यावा अशी मागणी महिलांनी माझ्याकडे केली आहे असे मांद्रे सरपंच अमित सावंत यांनी सांगितले.

सावंत म्हणाले, "पेडणे मतदारसंघाचे माजी आमदार व आता राज्यपालपद भूषवित असलेले राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनीही असाच जुगारबंदीबाबत निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना या निर्णयामुळे निवडणूकीत पराभावाचा सामना करावा लागला होता."

"जुगारबंदी विरोध केला म्हणून मला सरपंच पदावरून पुढच्या वेळी घरी बसविले तरी चालेल पण आपण मांद्रे गावात पुर्ण जुगार बंद करणारच. मी जुगाराचे समर्थन करणार नाही. जुगारामुळे गावातील महिलांना विवीध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात जुगारबंदीसारखा कठोर निर्णय फक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंतच घेवू शकतात असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com