Mandrem: मांद्रे पंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच महेश कोनाडकर यांच्या विरोधात 24 तासांच्या आत अविश्वास ठराव मांडण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात एकच चर्चा सुरु आहे.
(Mandrem panchayat Sarpanch Mahesh Konadkar faces no confidence motion within 24 hours from getting elected)
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या या पार्श्वभूमीवर आज काही ठिकाणी पंचाच्या शपथ पार पडल्या तर काही ठिकाणी अद्याप शपथ होणे बाकी आहे. मात्र याबरोबरच पेडणे तालूक्यातील मांद्रे ग्रामपंचायतीतील सरपंचाची निवड होऊन एक दिवस झाले आहे. असे असताना नवनिर्वाचित सरपंच महेश कोनाडकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाला मांडण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दयानंद सोपटे समर्थक कोनाडकर यांच्या विरोधात जित आरोलकर समर्थीत गटाने अविश्वास प्रस्ताव आणला असल्याची माहिती समोर आली आहे. यावर विस्तार अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 29 ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात येणार आहे. या दिवशी विस्तार अधिकारी सर्व पंचांचे मत घेत ठरावावर घेणार असून यावर निर्णय घेतला जाणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.