कलेची ताकद आपले आयुष्य बदलते - मंत्री गोविंद गावडे

24 वा दामोदर संगीत महोत्सवास मंत्री गोविंद गावडे यांनी लावली उपस्थिती
Damodar Music Festival
Damodar Music FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: ज्येष्ठ व कनिष्ठ संगीत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे मोठे भाग्य आहे. व्यासपीठ तयार होणार तेव्हाच कलाकार तयार होणार. स्वतःकडून मिळणारे ज्ञान व दुसऱ्याकडून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा लाभ घ्यावा. कलेची ताकद आपले आयुष्य बदलते यासाठी कलेची सेवा सदैव करीत रहावे, असे प्रतिपादन राज्य कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी केले.

(24th Shree Damodar Music Festival attended by Minister Govind Gawde at vasco)

श्री दामोदर संगीत संस्था मुरगाव आणि कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 24 वा श्री दामोदर संगीत महोत्सव प्रमुख पाहुणे या नात्याने कला व संस्कृतीक मंत्री गोविंद गावडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, संस्थेचे अध्यक्ष मोहन डिचोलकर, सचिव बलराम बांदेकर, रवींद्र भवन वास्कोचे अध्यक्ष जयंत जाधव उपस्थित होते.

Damodar Music Festival
गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, नौदलाने केली प्रवाशांची सुटका

यावेळी श्री दामोदर संगीत संस्थेतर्फे मुरगाव तालुक्यातील ज्येष्ठ भजनी कलाकारांचा सत्कार प्रमुख पाहुणे मंत्री गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यात दाबोळी चिखली येथील जेष्ठ भजनी कलाकार हरी गावडे व वास्को ओरुले येथील ज्येष्ठ भजनी कलाकार कमलाकांत मांद्रेकर, तसेच संस्थेचे अध्यक्ष मोहन डिजोलकर व ज्येष्ठ सदस्य आनंद हळदणकर यांचा सुद्धा सत्कार मंत्री गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.

वास्को रवींद्र भवन मध्ये 24 वा दामोदर संगीत महोत्सवाची सुरुवात प्रमुख पाहुणे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या हस्ते समई प्रजलित करून करण्यात आली. नंतर शास्त्रीय संगीत लावू नाईक यांनी सादर केले. त्यांना तबला साथ अमय पटवर्धन, संवादिनी दत्तात्रय म्हाळशी यांनी साथ संगत केली.

Damodar Music Festival
पेडणे तालुक्यातील नवनिर्वाचित पंचानी घेतली शपथ

पहिल्या सत्रातील शेवटी तबला एकल वादन मयंक बेडेकर यांनी सादर केले. त्यांना संवादिनीवर दत्तराज म्हाळशी यांनी साथ संगत केली. दुपारच्या सत्रात शास्त्रीय गायन किरण रायकर यांनी सादर केले. त्यांना संवादिनिवर शेखर नागडे, तबला जयेश हळदणकर यांनी साथ दिली. हार्मोनियम एकलवदन सुधांशू कुलकर्णी यांना संवादिनीवर दत्तराज म्हाळशी, अनंत घाटे, तबला मयंक बेडेकर यांनी साथ दिली.

शेवटच्या सत्रात शास्त्रीय गायन रमाकांत गायकवाड (मुंबई) यांनी सादर केले. त्यांना संवादिनीवर ततराज म्हाळशी तर तबला मयंक बेडेकर यांनी साथ दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सूर्या शेट्ये, अशोक मांद्रेकर, दिलीप काजळे, रोहित बांदोडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com