Goa Politics: 'मायकल'वरुन मांद्रेत राजकारण तापलं; खुनी हल्ल्यावरुन आजी - माजी आमदार आमने सामने

Mandrem Ex- Sarpanch Assault: मायकल लोबोंनी काही दिवसांपूर्वी मांद्रेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर कोनाडकर यांच्यावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे.
Goa Politics: 'मायकल'वरुन मांद्रेत राजकारण तापलं; खुनी हल्ल्यावरुन आजी - माजी आमदार आमने सामने
Michael Lobo, Dayanand Sopte And Jit ArolkarDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर मांद्रेतील राजकारण चांगलेच तापलं आहे. मायकल लोबो, दयानंद सोपटे आणि जीत आरोलकर याप्रकरणामुळे आमने सामने आले आहेत. कोनाडकर हल्ल्यामागे आमदार आरोलकर यांचा हात असल्याचा आरोप सोपटे यांनी केला. आरोपानंतर आरोलकरांनी सोपटेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी कोनाडकर यांच्यावरील हल्ल्यामागे स्थानिक आमदाराचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केलाय. आरोपानंतर आरोलकरांनी सोपटेंना कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा आरोलकरांनी दिलाय. मायकल लोबोंनी काही दिवसांपूर्वी मांद्रेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर कोनाडकर यांच्यावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे.

Goa Politics: 'मायकल'वरुन मांद्रेत राजकारण तापलं; खुनी हल्ल्यावरुन आजी - माजी आमदार आमने सामने
Mandrem Ex- Sarpanch Assault: महेश कोनाडकर खुनी हल्ल्यामागे जीत आरोलकर, माजी आमदाराच्या आरोपाने खळबळ; मांद्रेत राजकारण तापलं

मांद्रेत पहिलाच कांड - जीत आरोलकर

'मारामारी, गन फायरिंग अशा घटना पहिल्यांदा कळंगुट सारख्या भागात होत होत्या. ते येथे आल्यानंतर मांद्रेत ही पहिलीच घटना आहे. मांद्रेतील हा पहिलाच कांड आहे. याबाबत लोकांनी विचार करायला हवा. पण, झालं ते चुकीचे झालं आणि याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे', असे आमदार जीर आरोलकर म्हणाले. आरोलकरांनी या वक्तव्यातून नाव न घेता लोबोंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मांद्रेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळली आहे. खुलेआम धमकावण्याचे प्रकार होत आहेत. जी व्यक्ती चारवेळा पंच, दोनदा सरपंच होते, अशा कोनाडकरांवर भर दिवसा जीवघेणा हल्ला होतो, हे धक्कादायक आहे. या प्रकारामागे स्थानिक आमदाराचा हात आहे, असा आरोप दयानंद सोपटे यांनी केला आहे.

Goa Politics: 'मायकल'वरुन मांद्रेत राजकारण तापलं; खुनी हल्ल्यावरुन आजी - माजी आमदार आमने सामने
Goa Politics: 'कळंगुट'सोडून मायकल मांद्रेतून लढणार? 2027 च्या निवडणुकीबाबत लोबोंचे मोठं भाष्य

मांद्रेतून लढण्याबाबत सकारात्मक - मायकल लोबो

कोनाडकर हल्ला प्रकरणानंतर कळंगुटचे आमदार मायकल लोबोंनी मात्र मांद्रेतून लढण्याबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. मांद्रेच नव्हे तर संपूर्ण गोव्याबाबत मी सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कळंगुटमधील लोकांना मी नको असल्यास मांद्रेतून निवडणूक लढवणार, असे लोबो म्हणाले होते. त्यानंतर मांद्रेत राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com