Jeet Arolkar, Agarwada Government School
Jeet Arolkar, Agarwada Government School Dainik Gomantak

Government Schools: सरकारी शाळा वाचवणे गरजेचे! आरोलकरांचे आवाहन; आगरवाडा हायस्कूलचे दुरुस्तीकाम सुरू

Jeet Arolkar: आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले की, मांद्रे मतदारसंघात एकमेव सरकारी हायस्कूल आहे आणि हे हायस्कूल साठ वर्षांपूर्वीचे होते.
Published on

मोरजी: सरकारी शाळा सुसज्ज बनवण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू आहेत. पालकांनी सरकारी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना पाठवून त्या वाचवण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी आगरवाडा येथील सरकारी हायस्कूलच्या इमारतीच्या दुरुस्तीकामाचा शुभारंभ करताना केले.

यावेळी उपसरपंच शिल्पा नाईक, पंच दीपाली लिंगुटकर, पंच संगीता नाईक, पंच भगीरथ गावकर, देवस्थान समितीचे पदाधिकारी, माजी सरपंच तथा विद्यमान पंच सचिन राऊत, माजी सरपंच तथा पंच अँथनी फर्नांडिस, पालक-शिक्षक संघाचे अविनाश गावकर, मोरजकर, मुख्याध्यापक, शिक्षक, नागरिक आदी उपस्थित होते. स्वागत, सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक शिक्षक प्रशांत मांद्रेरेकर यांनी केले.

Jeet Arolkar, Agarwada Government School
Goa Politics: खरी कुजबुज, 'जीत'चे भाजप प्रेम!

आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले की, मांद्रे मतदारसंघात एकमेव सरकारी हायस्कूल आहे आणि हे हायस्कूल साठ वर्षांपूर्वीचे होते. त्यामुळे या हायस्कूलच्या इमारतीच्या दुरुस्तीची गरज होती. त्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करून पालक-शिक्षक संघाने याचा पाठपुरावा करून या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला आहे.

Jeet Arolkar, Agarwada Government School
jeet Arolkar: 'सरकारात राहून युती धर्म विरोधात बोलू शकत नाही'; जीत आरोलकर यांचे विधान

सरकारने १ कोटी २० लाख रुपये खर्च करून या इमारतीची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्यातून या इमारतीचे काम सुरू होत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व वर्ग चकाचक करून देणार, अशी ग्वाही यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com