Mandovi River Pollution: मांडवी नदीच्या प्रदूषणाला कॅसिनो जबाबदार असल्याचे पुरावे नाहीत; सांडपाणी वाहिन्यांकडे संशयाची सुई

Goa Pollution Control Board Report: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडवी पुलापासून ‘आयएफएफआय’ जेटीपर्यंतच्या नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासली.
Goa Pollution Control Board Report
Mandovi River PollutionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: मांडवी नदीतील प्रदूषणासाठी कॅसिनोंना जबाबदार धरले जात असतानाच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पावसाळी पाहणी अहवालात कॅसिनोंमधून थेट सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. उलट, पणजीच्या सांतिनेज खाडीतून मांडवीत येणारे सांडपाणी, ओरेम खाडीतील मोठा प्रवाह आणि शहरातील अन्य निचरा वाहिन्यांमधून नदीत मिसळणारे पाणी याकडे प्रदूषणाची संभाव्य कारणे म्हणून लक्ष वेधले आहे.

त्यामुळे मांडवी प्रदूषणाचा प्रश्न केवळ नदीत उभ्या असलेल्या कॅसिनोंपुरता मर्यादित न ठेवता, शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाच्या व्यापक प्रश्नाच्या दृष्टिकोनातून तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडवी पुलापासून ‘आयएफएफआय’ जेटीपर्यंतच्या नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासली.

Goa Pollution Control Board Report
Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

२४ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या पावसाळी पाहणीत २२ ठिकाणांहून भरती आणि ओहोटीवेळी प्रत्येकी एक, असे ४४ नमुने संकलित केले. या सर्व नमुन्यांमध्ये मलजन्य कोलिफॉर्म जीवाणूंचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आढळले. मात्र, या निष्कर्षावरून कॅसिनोंमुळेच नदीचे पाणी दूषित होत असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही, असे अहवालातील निरीक्षणांवरून स्पष्ट होते.

ओरेम खाडीतून २० हजार लिटरपेक्षा अधिक पाणी

पाटो येथील जुन्या पुलाजवळील ओरेम खाडीतून दर मिनिटाला २० हजार लिटरपेक्षा अधिक पाणी वाहत असल्याचे मंडळाच्या पाहणीत आढळले. या प्रवाहात घरगुती सांडपाण्याचे प्रमाण अंदाजे १० ते १५ टक्के असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

निचरा वाहिनीत प्लास्टिकसह घनकचरा

बेती किनाऱ्यावरील पेन्ह द फ्रान्सजवळील निचरा वाहिनीतून दर मिनिटाला सुमारे १०० लिटर पाणी वाहत असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. या प्रवाहात घरगुती सांडपाणी आणि पावसाचे पाणी मिसळलेले होते. निचरा वाहिनीच्या तळाशी प्लास्टिक आणि इतर घनकचरा साचल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले.

कॅसिनोंवरील आरोपांना पुष्टी नाही

मांडवी नदीतील कॅसिनोंच्या उपस्थितीमुळे नदीच्या प्रदूषणाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होतात. तथापि, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीदरम्यान कॅसिनोंमधील सांडपाणी थेट मांडवी नदीत सोडले जात असल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. अहवालानुसार, कॅसिनोंमधील सांडपाणी संकलित करून त्याची हाताळणी केली जाते आणि पाटो येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंत नेण्याची व्यवस्था आहे.

ओहोटीवेळी जीवाणूंचे प्रमाण जास्त

१ मांडवीतील प्रदूषणाची तीव्रता पाण्याचा रंग किंवा दुर्गंधी यांवरून ठरत नाही. मलजन्य कोलिफॉर्म जीवाणूंसाठी निर्धारित मर्यादा प्रति १०० मिली पाण्यात १०० एमपीएन असताना, भरतीवेळी नमुन्यांतील प्रमाण १३० ते ५४० एमपीएन, तर ओहोटीवेळी १३० ते ९४० एमपीएनपर्यंत नोंदविण्यात आले.

२ ओहोटीवेळी दोन ठिकाणी ९४० एमपीएन हे सर्वाधिक प्रमाण आढळले. म्हणजेच निर्धारित मर्यादेच्या ९.४ पट जीवाणूंचे प्रमाण या नमुन्यांत होते. भरतीवेळीही सर्व ४४ नमुन्यांत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाण आढळले. भरती व ओहोटीवेळीच्या सर्व ४४ नमुन्यांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक जीवाणू आढळले.

३ पावसाळ्यापूर्वी जून २०२६ मध्ये १८ ठिकाणांहून घेतलेल्या ३६ नमुन्यांपैकी १६ नमुन्यांतील जीवाणूंचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कमी होते. याउलट पावसाळ्यातील सर्व ४४ नमुने मर्यादेपेक्षा अधिक दूषित आढळले. पावसाळ्यातील १२ नमुन्यांत जीवाणूंचे प्रमाण ५०० एमपीएनपेक्षा अधिक होते.

पाण्याच्या रंगात मोठा बदल

सांतिनेज खाडीतील पाणी मांडवीला मिळाल्यानंतर नदीच्या तुलनेने स्वच्छ दिसणाऱ्या पाण्याचा रंग सुमारे ७० मीटरपर्यंत बदललेला दिसत होता. या प्रदूषित पट्ट्यापासून जवळपास ६० ते ७० मीटर अंतरावर एक कॅसिनो असल्याचेही अहवालात नमूद आहे. भरतीच्या वेळी या खाडीतील प्रदूषित पाणी तीन पुलांच्या पलीकडे वरच्या दिशेने पसरू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Goa Pollution Control Board Report
Goa Cricket News: गोव्याचा मोसमातील पहिला विजय! कर्नल नायडू करंडकात बिहारला 174 धावांनी धूळ चारली

सांतिनेज खाडीतून दर मिनिटाला १५ हजार लिटरपर्यंत प्रवाह

प्रदूषण नियंत्रण मंडळाने सप्टेंबर २०२६ मध्ये मांडवीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील निचरा वाहिन्यांची पाहणी केली. या पाहणीत पणजीच्या बाजूला सांतिनेज खाडीमधून मांडवीत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह विशेष चिंताजनक असल्याचे नमूद केले आहे.

योगा ब्रिजजवळील या खाडीतून दर मिनिटाला सुमारे १० ते १५ हजार लिटर पाणी वाहत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. या पाण्याचा रंग गडद होता. त्यात काळसर तरंगणारे पदार्थ आढळले, तसेच कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांमुळे दुर्गंधी येत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com