Goa News | Pramod Sawant
Goa News | Pramod Sawant Dainik Gomantak

Goa News: गोव्यातही दुर्धर आजारांवर होणार संशोधन- प्रमोद सावंत

Goa News: गोव्यात उभारण्यात येणाऱ्या आयुर्वेद इन्स्टिट्यूट आणि संशोधन केंद्रात दुर्धर आजारांवर संशोधन केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री सावंतांनी सांगितले.

Goa News: गोव्यात उभारण्यात येणाऱ्या आयुर्वेद इन्स्टिट्यूट आणि संशोधन केंद्रात दुर्धर आजारांवर संशोधन केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. आयुर्वेदाची सेवा, प्रचार आणि शिक्षण यासाठी कार्यरत असलेल्या आयुर्वेद व्यासपीठाच्या आयुर्वेद पर्व रजत महोत्सवानिमित्ताने ते नागपूर येथे बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, समाजासाठी काम करण्याच्या आयुर्वेदाच्या शिकवणीमुळेच मी आमदार, सभापती आणि मुख्यमंत्री झालो. गेली अनेक वर्षे देशभरातील वैद्य आयुर्वेदाच्या प्रचार प्रसारासाठी काम करत आहेत. आयुर्वेदाला समाज मान्यता मिळाली होती, मात्र राजमान्यता देण्याचा काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 21 जूनला जागतिक आयुर्वेद दिन म्हणून जागतिक व्यासपीठावर नेण्याचे काम हे त्यांनी केले आहे.

Goa News | Pramod Sawant
Governor P S Sreedharan Pillai यांची गोवा भ्रमंती! पिरणा येथील 200 वर्ष जुन्या पवित्र वृक्षाला दिली भेट

आज जगातले 121 देश हा दिवस साजरा करत असून त्यानिमित्ताने आयुर्वेदाचा प्रसार प्रचार होत आहे. त्यांच्याच कार्यकाळात आयुर्वेदाची स्वतंत्र मंत्रालय स्थापन होऊन त्या अंतर्गत असणाऱ्या आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग आणि होमिओपॅथीसारख्या पॅथीना जागतिक मान्यता मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनांनी पारंपरिक औषधांना मान्यता दिली आहे. या पुढील काळात ही गंभीर आजारांवर संशोधनाची नितांत गरज आहे. गोव्यात उभारण्यात येत असलेल्या आयुष मंत्रालयाच्या संशोधन केंद्रात याबाबत संशोधन होईल.

दिनचर्या, ऋतूचर्या अंगीकारा

आयुर्वेदासाठी महत्त्वाचे असणारी दिनचर्या आणि ऋतुचर्या सर्वांनी अंगीकारल्यास त्याचा फायदा नक्कीच सामान्य माणसाचा आरोग्य सुधारण्यासाठी होतो. हे यापूर्वी अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. आयुर्वेदीक उपचार हे विविध प्रकारच्या विमाअंतर्गत कव्हर करता यावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना आवाहन केले आहे.जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेने उभारण्यात येत असलेल्या पारंपरिक औषधी संशोधन केंद्रामुळे आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसाराला बळ मिळणार असल्याचाही ते म्हणाले.

वेलकम टू गोवा.. : आठ ते अकरा डिसेंबर दरम्यान गोव्यात होणाऱ्या जागतिक आयुर्वेद काँग्रेसचे स्वागत आहे. या जागतिक परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या आयुर्वेद परिषदेच्या निमित्ताने नागपूरमध्ये उपस्थितांना केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com