कुळे: कुळे दूधसागर धबधब्याच्या ठिकाणी ट्रेकिंगद्वारे पर्यटकांना नेऊन आणण्यासाठी गाईड्स नियुक्त आहेत. परंतु जीटीडीसी व गोवा वन विकास महामंडळाने लावलेल्या अनाठायी शुल्कामुळे काल १७ ऑगस्टपासून येथील गाईड्स आपल्या मागण्या घेऊन आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस होता.
गाईड्सच्या मागण्यांची अजूनपर्यंत कोणीच दखल घेतलेली नाही. संबंधित खात्यांचे अधिकारी व जीटीडीसीचे चेअरमन आमदार डॉ. गणेश गावकर यांनी आमचा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वन खात्याने सकाळी ८ ते १० या वेळेत प्रवेश निश्चित केला आहे, तो सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत करून पर्यटकांना घेऊन जाण्यास परवानगी द्यावी.
गोवा पर्यटन विकास महामंडळ व गोवा वन विकास महामंडळ यांनी लावलेला कर मागे घ्यावा.
एका गाईडला ८ जण पर्यटक नेण्यास परवानगी आहे, ती १० करावी.
पर्यटकांना चेंजिंग रुम तसेच शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
रेल्वेतून येणारे पर्यटक सोनावळी येथे उतरतात. रेलमार्गे धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना आवर घालावा.
पावसाळा सुरु झाल्यानंतर लगेच ट्रेकिंग सुरू करणे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.