चिकनच्या तीन तुकड्यांसाठी मित्राने केली मित्राचीच निर्घृण हत्या, म्हापशातील खून प्रकरणाचे गूढ उकलले; संशयिताला पकडण्यात यश

Goa Crime News: बोडगिणी-म्हापसा येथील मरड परिसरात आढळलेल्या बेवारस मृतदेहाचे गूढ उकलण्यात म्हापसा पोलिसांना अखेर यश आले आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: बोडगिणी-म्हापसा येथील मरड परिसरात आढळलेल्या बेवारस मृतदेहाचे गूढ उकलण्यात म्हापसा पोलिसांना अखेर यश आले आहे. केवळ चिकनच्या तीन तुकड्यांवरून झालेल्या वादातून एकाची निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आसाममधील सावंगखोबा सिंग (वय ४३ वर्षे) याला अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर राहणारे तिघे मित्र या घटनेच्या दिवशी चिकन आणि दारूची पार्टी करत होते.

जेवत असताना संशयित सावंगखोबा याच्या ताटात चिकनचे तीन तुकडे कमी आले. याच कारणावरून त्याचा पीडित व्यक्तीसोबत जोरदार वाद झाला.

Goa Crime News
Goa Job Scam: गोव्यात आणखी एक 'कॅश फॉर जॉब'? विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; 9 जणांची पोलिसांत तक्रार

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात सावंगखोबाने बिअरची बाटली पीडिताच्या कानावर आणि चेहऱ्यावर जोरात मारली. या हल्ल्यानंतर संशयित आणि त्याचा दुसरा मित्र तेथून पसार झाले. जखमी अवस्थेतील ती व्यक्ती चालतच जवळच्या शेतात गेली आणि तेथेच झोपली.

मात्र, वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.म्हापसा येथील नवीन कदंब बसस्थानकाजवळील रस्त्यालगत आडोशाला हा प्राणघातक हल्ला झाला होता.

तिथेच हे तिघेजण चिकन व दारूची पार्टी करत होते. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसली तरी, पोलिसांनी मानवी गुप्तचरांच्या मदतीने संशयिताचा माग काढला आणि शुक्रवारी त्याला बेड्या ठोकल्या. खुनाची घटना २८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली होती.

Goa Crime News
Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

सिनेस्टाईल पाठलागानंतर मुसक्या आवळल्या

मित्रावर प्राणघातक हल्ला केल्यानंतरही संशयित गोव्यातच लपून बसला होता. मात्र, म्हापसा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने त्याचा आज माग काढला आणि त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com