Margao Railway Station: भलतं धाडस जीवावर बेतलं! मडगाव येथे रेल्वेच्या ओव्हरहेड तारेच्या संपर्कात आलेल्या इसमाचा मृत्यू

पोलिसांनी मृतदेह निर्मोदच्या कुटुंबियाच्या हवाली केला
 Jharkhand Man Death at Margao Railway station
Jharkhand Man Death at Margao Railway station Dainik Gomantak

man from jharkhand climbed on railway roof at Margaon station and electrocuted

मडगाव रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या छतावर उभे राहून विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. निर्मोद लगून (29) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मूळचा झारखंडचा रहिवासी आहे. सदर घटना 16 नोव्हेंबरला घडली.

 Jharkhand Man Death at Margao Railway station
Goa Live Updates 01 December: विजय हजारे करंडकमध्ये गोव्याच्या सुयश, स्नेहलची शतके

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मोद झारखंडहून गोव्यात कामासाठी आला होता. तो मडगावमधील गांधी मार्केटमध्ये राहत होता. 16 नोव्हेंबरला गोव्यात आल्यानंतर मडगाव रेल्वेस्थानकावर हा प्रकार घडला.

तो तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय त्यावेळी त्याने मद्यप्राशनही केले होते. त्यावेळी तो रेल्वे इंजिन डब्यावर चढला. विजेच्या तारांशी संपर्क आल्याने त्याला शॉक लागला आणि तो गंभीररित्या भाजला.

त्यानंतर त्याला त्वरितच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नंतर त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. मागील काही दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. पण तो गंभीररित्या जखमी झाला असल्याने त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. या घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी मृतदेह निर्मोदच्या कुटुंबियाच्या हवाली केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com