Pernem News: मोरजी खाजगी जागेत ड्रोनद्वारे चित्रिकरण भोवले; ड्रोन मालकाविरुध्द तक्रार दाखल

कंपनीच्या व्यवस्थापकाने पेडणे पोलिसांत लेखी तक्रार दाखल करण्यात आली.
Drone
DroneDainik Gomantak
Published on
Updated on

Pernem Crime News: पेडणे तालुक्यातील मोरजी येथे एका खाजगी जागेत ड्रोनद्वारे शूटिंग केल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकाने पोलिसांत ड्रोन मालकाविरुध्द लेखी तक्रार दाखल केली आहे. याआधीही ड्रोनमालक मयूर शेटगावकर याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबतची माहिती व्यवस्थापक पेडणेकर यांनी दिली.

Drone
Goa Illegal Sand Mining: सावर्डेत बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या आठ होड्या जप्त; कुडचडे पोलिसांची कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगा रेडी इन्फ्रा प्रायव्हेट लि.च्या जागेत मोरजी येथे मयूर शेटगावकर याने कंपनीकडून कोणतीही परवानगी न घेता ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याची लेखी तक्रार पेडणे पोलिसांत दाखल करण्यात आली.

कंपनीचे व्यवस्थापक योगेश्वर पेडणेकर यांनी ही तक्रार दाखल केली असून याआधीही त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

पुढे म्हणाले, एखाद्या जागेचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करायचे असेल तर संबंधितांची परवानगी घ्यावी लागते. कायद्यानुसार परवानगी घेवून ड्रोनद्वारे चित्रीकरण करावे. शेटगावकर यांनी अशी कोणतीही परवानगी घेतलेली नाही असे पेडणेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nuvem Apartment Project
Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Morjim Thar Accident
South Korea former president sentenced
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com