अर्ध्या तासाच्या पावसानं मालपेतील रस्त्यांना ओहळाचे स्वरूप; वाहनचालकांचा खोळंबा; निचरा व्यवस्था नसल्याने समस्या

Malpe Waterlogging: योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे केवळ अर्धा तास जोरदार पाऊस झाल्यानंतर दोन्ही सेवा रस्त्यांना ओहळाचे स्वरूप प्राप्त झाले.
Malpe
Malpe Dainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मालपे येथील उड्डाणपुलाखाली पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे केवळ अर्धा तास जोरदार पाऊस झाल्यानंतर दोन्ही सेवा रस्त्यांना ओहळाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

पाऊस सुरू झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच उड्डाणपुलाखाली दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केलेल्या काही कारच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने त्या बंद पडल्या. दुचाकीस्वारांना आपली वाहने चालविणे कठीण होऊन गेले. सुमारे अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर उड्डाणपुलाखालील व सेवा रस्त्यांवरील पाणीही हळूहळू ओसरले.

Malpe
Goa Monsoon: पावसाचा 20 इंचांचा टप्पा पार, मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम; रविवारी 1 इंच पावसाची नोंद

राष्ट्रीय महामार्गावरील हा उड्डाणपूल उभारताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना न करता केवळ पाइप टाकून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठा पाऊस झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील पाणी सेवा रस्त्यावरून वाहत येऊन उड्डाणपुलाखाली साचते.

Malpe
Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

वाहनचालकांना जलाभिषेक

राष्ट्रीय महामार्गावरील पावसाचे पाणी धबधब्याप्रमाणे सेवा रस्त्यावर कोसळत असल्यामुळे तेथून जाणाऱ्या वाहनचालकांना हा जलाभिषेक सहन करत वाहने चालवावी लागतात. याचा दुचाकीस्वारांना विशेष त्रास होतो. रेनकोट परिधान केलेला असतानाही ते चिंब भिजून जातात. महामार्गावरील पाणी थेट गटाराद्वारे रस्त्याबाहेर वळविण्याची व्यवस्था केल्यासच ही समस्या सुटू शकेल, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com