Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

Mala Lake Pollution case: मळा तलावात मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याने न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान परिसरातील घरांची पाहणी करण्यात आली होती.
Mala lake fish mortality goa
Mala lake fish mortality goaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मळा तलावात मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याने न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान परिसरातील घरांची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी अनेक घरांना सांडपाणी जोडणी नसल्याचे समोर आले होते.

तलावाच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या या ३८ घरांपैकी ३२ घरांनी आता सांडपाणी जोडणी पूर्ण केली असल्याची माहिती महानगरपालिकेने न्यायालयात दिली आहे. दरम्यान, याचिकेची व्याप्ती वाढवत न्यायालयाने मांडवी नदीतील वाढत्या प्रदूषणाचीही दखल घेतली असून, अहवाल दोन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्याची माहिती महाधिवक्ता देविदास पांगम यांनी दिली.

Mala lake fish mortality goa
Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

मळा तलावाच्या विषयासोबतच मांडवी नदीतील ‘फिकल कोलिफॉर्म’ जिवाणूंचे वाढते प्रमाण आणि कॅसिनोंमुळे होणारे प्रदूषण यावर न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मांडवीतील कॅसिनो आणि पर्यटन बोटींच्या परिसरातील पाण्याचे तातडीने गुणात्मक आणि परिमाणात्मक परीक्षण करण्याचे आदेशही गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आले आहेत.

४ घरमालकांना मनपा नोटीस बजावणार उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पणजी महानगरपालिकेने सद्यस्थिती स्पष्ट केली आहे. तलावात सांडपाणी सोडणाऱ्या एकूण ३८ घरांची ओळख पटविल्यानंतर, त्यापैकी ३२ घरांनी अधिकृत सांडपाणी जोडणी पूर्ण केली आहे. तर २ घरांनी जोडणीसाठी अर्ज केले असून ४ घरे अद्यापही नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करत आहेत. या ४ घरमालकांना महानगरपालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

Mala lake fish mortality goa
Mandovi River Casinos: मांडवी नदीतील कॅसिनोंच्या संचालनाची स्वतंत्र चौकशी करा! 'इनफ इज इनफ' तर्फे राज्यपालांकडे मागणी

पावसाळ्याचे कारण न्‍यायालयाला अमान्‍य

ॲड. नायजेल फर्नांडिस यांनी प्रतिनिधींना सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अद्ययावत मांडवीचा अहवाल उपलब्ध नाही. न्यायालयाने मागितलेला मांडवीतील अहवाल तयार करण्यासाठी मंडळाने डिसेंबरपर्यंत वेळ मागितला होता. पावसाळ्यामुळे अडथळे येऊ शकतात, असे कारणही न्यायालयात मांडण्यात आले होते. तरीही न्यायालयाने मंडळाला दोन आठवड्यांत अंतरिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्‍यायालयीन मित्र म्‍हणून फर्नांडिस कार्यरत

मळा तलावाबरोबरच मांडवी नदीच्या प्रदूषणाचा विषयही या जनहित याचिकेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. नदीपात्रातील कॅसिनो आणि पर्यटन बोटींमुळे होणाऱ्या प्रदूषणाची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. नायजेल फर्नांडिस काम पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com