Goa Latest Update| तरुण आणि महिलांना उद्योजक बनवणार; रोहन खंवटे

टी आणि व्ही हब विकसित करणार
रोहन खंवटे
रोहन खंवटेDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा आधार घेऊन तेलंगण राज्याच्या धर्तीवर टी आणि व्ही हब विकसित करणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. माहिती आणि तंत्रज्ञान सल्लागारांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सल्लागार समितीची पहिली बैठक झाली. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आयटी महामंडळ अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये, श्रीनिवास धेंपे, स्वाती साळगावकर, राल्फ डिसुझा, रायन कार्व्हालो  उपस्थित होते.

(Making youth and women entrepreneur says Rohan Khanate)

रोहन खंवटे
Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्यक्षपदाचा आज होणार फैसला

मंत्री खंवटे म्हणाले, या वर्षातील शेवटची तिमाही सुरू आहे. माहिती तंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राज्यात विविध प्रोजेक्ट राबवणे सुरू आहे. ज्या आधारे राज्यातील तरुणांना रोजगारसंधी उपलब्ध होतील. तेलंगणाच्या धर्तीवर यासाठी टास्कची मदत घेण्यात येत असून त्या आधारे राज्यात अस्तित्वात असलेल्या शिक्षित बेरोजगारांना काम मिळेल अशा उद्योजकांना आर्थिक मदत देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. टी हबच्या माध्यमातून होतकरू तरुण उद्योजकांना ‘इंक्युबॅशन सेंटर’च्या माध्यमातून जागा निर्माण करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

तुये, पेडणे, पर्वरीत आयटी साधनसुविधा

माहिती तंत्रज्ञान खात्याच्यावतीने तुये, पेडणे आणि पर्वरी येथे माहिती तंत्रज्ञान साधन सुविधा क्लस्टर निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी टास्क या प्रकल्पाच्या आधारे नियोजन करण्यात येत असून त्याचा फायदा स्थानिक नवउद्योजकांना होईल, असे मंत्री रोहन खंवटे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com