Khandola News : सजगतेने करा करियर निवड : ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

Khandola News : कुंडई श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर पद्मश्री सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्योतिषशास्त्राद्वारे करिअर’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी बोलत होते.
Khandola
KhandolaDainik Gomantak

Khandola News :

खांडोळा, ज्योतिषशास्त्र हे अत्यंत प्रभावी आणि प्रगत शास्त्र आहे. तज्ज्ञ ज्योतिषांकडून हे शास्त्र आपण समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाची जशी राशी, लग्न असते, त्याप्रमाणे त्या त्या ग्रहाचा आपल्यावर प्रभाव असतो.

खांडोळा, ज्योतिषशास्त्र हे अत्यंत प्रभावी आणि प्रगत शास्त्र आहे. तज्ज्ञ ज्योतिषांकडून हे शास्त्र आपण समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाची जशी राशी, लग्न असते, त्याप्रमाणे त्या त्या ग्रहाचा आपल्यावर प्रभाव असतो.

म्हणून माणसाचा स्वभाव ग्रह आणि राशीवरून ठरतो. ज्याेतिषशास्त्रानुसार करिअर घडवा, असे प्रतिपादन पद्मश्री सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी केले.

कुंडई श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर पद्मश्री सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्योतिषशास्त्राद्वारे करिअर’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी बोलत होते.

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी म्हणाले की, कोणाला रिसर्च करायला, कोणाला खूप चिंतन करायला, कोणाला खूप वाचायला आवडते. काही मुलांना शाळेत बसायलाच नकोसे वाटते. त्यांना कायम खेळावेसे वाटते. काहींना पोहायला आवडते. कोणाला वस्तू, घटक तपासायला आवडतात. अशाप्रकारे प्रत्येकाच्या राशीनुसार वेगवेगळ्या आवडी-निवडी असतात.

Khandola
Goa SSC Exam: गोव्यात पूर्णत: अंध विद्यार्थ्याने संगणकाच्या मदतीने कशी दिली दहावीची परीक्षा?

ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपल्या मुलांना शिक्षण दिल्यास कधीच अपयश पदरी पडणार नाही. आताच आपले क्षेत्र नक्की करा, जेणेकरून अ‍ॅडमिशन घ्यायला सोपे जाईल, असे पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी विद्यार्थ्यांना कार्यशाळेत सांगितले.

या कार्यक्रमास सदगुरू फाऊंडेशनच्या अध्यक्ष ॲड. ब्राह्मीदेवीजी, संचालक नीलिमा मांद्रेकर, एक्झिक्युटर प्रवीणा नार्वेकर, सचिन गावकर, माधव खानोलकर, पालक-शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com