Goa Accident Cases: सर्व पोलिस स्थानके, आरटीओंना अल्कोहोल मीटर उपलब्ध करुन द्या; आमदार फेरेरांची मागणी

मद्यधुंद स्थितीत बेदरकारपणे गाडी चालवून पर्यटकांकडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे
Mla Carlos Ferreira
Mla Carlos FerreiraDainik Gomantak
Published on
Updated on

मद्यधुंद स्थितीत बेदरकारपणे गाडी चालवून पर्यटकांकडून सध्या कथित जीवघेणे अपघात घडताहेत. अशाने अनेकांवर जीव गमविण्याची पाळी ओढवली आहे. या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातास जितके कारचालक जबाबदार असतात, तितकेच पोलिस व आरटीओ दोषी असल्याचा आरोप हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी केला आहे.

Mla Carlos Ferreira
तेल समजून ओतले पेट्रोल; पणती लावताना झाला भडका अन् महिला होरपळली

या ड्रंक अ‍ॅण्ड ड्रायव्हसंदर्भात फेरेरा यांनी मुख्य सचिव, गृहमंत्रालय सचिव, वाहतूक सचिव, डीजीपी, वाहतूक संचालकांना पत्र लिहून ड्रंक अ‍ॅण्ड ड्रायव्हिंग करणार्‍यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

अ‍ॅड. कार्लुस फेरेरा पुढे म्हणतात की, मद्यधुंद स्थितीत वाहने हाकणार्‍या कारचालकांची वेळोवेळी तपासणी होत नसल्यानेच हे प्रकार वाढलेत. पोलिस तसेच वाहतूक यंत्रणेकडे आवश्यक ब्रीथलायझर किट नाहीत. त्याचप्रमाणे, हणजूण पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांनी शनिवारी वागातोर येथे अपघातात रिसार्ट मालकीणीचा अपघाती मृत्यू प्रकरणात विधान केले होते की, संशयित कारचालक कुरुपचा अल्कोहोल रिपोर्ट दोन-तीन दिवसांत येईल. याचाच अर्थ हणजूण पोलिस यंत्रणेकडे अल्कोहोल मीटर नाहीत.

वाहतूक पोलिसांकडे अल्कोहोल मीटर उपलब्ध करुन दिलेत. तसेच, पोलिसांना सुद्धा अल्कोहोल मीटर उपलब्ध करुन द्यावेत. आणि वाहतूक पोलिसांनी रात्रीच्या वेळी कारचालकांची अल्कोहोल चाचणी करणे गरजेचे आहे. मुळात, काही अपघाती घटना घडल्यानंतरच सक्रियपणे काही दिवसांकरिता अल्कोहोल चाचणी मोहीम राबविणे चुकीचे आहे. अशा चाचण्या वेळोवेळी व दरवेळी होणे गरजेचे आहे.

जिथे तारांकित हॉटेल्स व पार्ट्या होतात त्याठिकाणी पोलिसांना नियुक्त करुन ड्रंक अ‍ॅण्ड ड्रायव्हिंगच्या चाचण्या करणे गरजेचे. अशा ठिकाणी पोलिस तैनात केल्यास लोकांमध्ये भीती राहिल. आणि हॉटेलस्थळी येणार्‍या ग्रुपमधील एक व्यक्ती दारुचे प्राशन करणार नाही व तिच व्यक्ती गाडी चालवेल, असेही फेरेरा यांनी निवेदनात नमूद केले.

दरम्यान, रस्त्यांवर स्टंटबाजी करणार्‍यांवर सुद्धा पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. कारण, त्यांच्यामुळे इतरांचा जीव धोक्यात येतो. तसेच, सरकार व संबंधित विभागाने दक्ष होण्याची आवश्यकता आहे. कारण, अलीकडे दारु पिऊन गाडी चालविणे हे फॅशन बनले आहे. परिणामी, अनेकदा अपघात घडतात व निष्पाप लोकांचा बळी जातो.

त्यामुळे गोवा हे पर्यटक व इतरांसाठी असुक्षित जागा नाही, असा चूकीचा संदेश जाईल. हे प्रकार बंद होण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यके. त्यासाठी सर्व पोलिस स्थानके, आरटीओ यांना अल्कोहोल मीटर उपलब्ध करुन द्यावेत.

वेळोवेळी अल्कोहोल चाचणी रस्त्यांवर व्हाव्या. तसेच दारुचे प्राशन करुन गाडी चालविणार्‍यांचे वाहन परवाना तत्काळ निलंबित करावा. तसेच, ड्रंक अ‍ॅण्ड ड्रायव्हिंग करीत असल्यास कारचालकावर भादंसंच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद करावा, अशी मागणी त्यांनी वरील निवेदनातून केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com