Majorda: तरुणाला शिंगावर घेऊन आपटले, शिंग घुसले छातीत! 'त्या' रेड्याला पाजले होते उत्तेजक द्रव्य! 6 जणांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा

Majorda dhirio bull Accident: माजोर्डा येथे धीरयोच्‍या वेळी रेडा उधळल्‍याने राजेश निस्तानी या युवकाचा बळी केला. चांदो ह्या रेड्याला झुंजीपूर्वी उत्तेजक द्रव्य पाजण्यात आले होते.
Majorada dhirio bull incident
Majorada dhirio bull incidentDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: माजोर्डा येथे धीरयोच्‍या वेळी रेडा उधळल्‍याने राजेश निस्तानी या युवकाचा बळी केला. चांदो ह्या रेड्याला झुंजीपूर्वी उत्तेजक द्रव्य पाजण्यात आले होते, त्यामुळेच तो उधळला गेला, अशी माहिती पुढे आली आहे. त्या उधळलेल्या रेड्याने निस्तानी याला चार ते पाचवेळा शिंगावर घेऊन खाली पाडले, असे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे. रेड्याचे शिंग छातीत घुसल्याने त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, झुंजीत मैदानात उतरविणाऱ्या प्रत्येक रेड्याला किंवा बैलाला चेव येण्यासाठी उत्तेजके पाजली जातात. या रेड्यावरही तसेच प्रकार केले गेले होते. मात्र, दुसऱ्या महाकाय रेड्याला मैदानात पाहिल्यावर चांदो रेडा मैदान सोडून धावायला लागला. त्याला परत मैदानात आणण्याचा प्रयत्न केला असता तो उधळला गेला. दरम्यान हा रेडा नेमका कुणाचा या संभ्रमात पोलिस पडले आहे.

हा रेडा सांतान कार्दोज याने आपल्या मालकीचा असा दावा केला असला तरी मिळत असलेल्या माहितीनुसार तो रेडा कुडतरीचे माजी सरपंच रूय मिनेझिस याच्या मालकीचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेड्याचा मूळ मालक कोण हे लपविण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, माजोर्डा येथे ज्या मोकळ्या शेतात ह्या धीरया झाल्या होत्या ती जागा पर्यटन महामंडळाच्या मालकीची असल्याने भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी या मोकळ्या जागेला कुंपण घालावे, अशी शिफारस दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी पर्यटन महामंडळाला केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. सध्या रूय मिनेझिस हा फरार झालेला आहे.

Majorada dhirio bull incident
महिनाभरात बैलांना मायक्रोचीप बसवा, अन्‍यथा 50 हजार दंड; धीरयो रोखण्‍यासाठी मालकांना 'वेसण'

या प्रकरणी तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार रूय याला अटक करण्यासाठी पोलिस त्याच्या घरी गेले असता तो त्यांना तिथे सापडला नाही. हा रेडा रूय याच्या मालकीचा असे सगळेच म्हणत असताना पोलिसाना सांतान कार्दोज याने तो रेडा आपल्या मालकीचा असा कबुलीजबाब दिला आहे.

रूय मिनेझिस हा बेकायदेशीर रेती व्यवसायातही असून यापूर्वी या प्रकरणीही त्याच्या विरोधात गुन्हे नोंद झाले आहेत.

Majorada dhirio bull incident
'बैलांची झुंज' आपल्या संस्कृतीचा भाग नाही, जीत आरोलकरांच्या 'धीरयो' कायदेशीर करण्याच्या मागणीला मंत्री ढवळीकरांचा विरोध

धीरयोद्वारे लाखोंची उलाढाल

१.धीरयो हा किनारपट्टी भागात चालणारा एक लोकप्रिय असा परंतु बेकायदा झुंजीचा खेळ आहे. या खेळात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. या झुंजीत रेडा किंवा बैल उतरविण्यासाठीच काही लाख रुपये मोजले जातात.

२. ज्या वेळी धीरयो सुरू असतात, त्यावेळी लाखो रुपयांच्या पैजी लावल्या जातात. त्याशिवाय धीरयो सुरू असताना बाजूला गडगडा हा जुगारही सुरू असतो. काही जण हा जुगार खेळण्यासाठी येतात. धीरयोना संरक्षण देण्यासाठी पोलिसांना प्रत्येक धीरयोमागे २५ ते ३० हजारांचा हप्ता मिळत असतो, असेही खासगीत बोलले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com