फोंड्यात ‘झाडा’झडती; वाहने, घरांचे नुकसान

व्यंकटेश लीला हॉटेलजवळ पार्क करून ठेवण्यात आलेल्या व्हॅनवर (जीए ०६ डी ७२११) झाड कोसळल्याने एक लाखापेक्षा अधिक रुपयांची हानी झाली.
Goa Rain Accident
Goa Rain AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: अधूनमधून येणारा सोसाट्याचा वारा आणि कोसळणाऱ्या पावसाच्‍या मुसळधार सरी यामुळे फोंडा तालुक्यात गेले चार दिवस मोठी पडझड सुरू आहे. घरांवर, वाहनांवर झाडे कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. आज शनिवारी दुपारी बांदोडा येथे व्यंकटेश लीला हॉटेलजवळ पार्क करून ठेवण्यात आलेल्या व्हॅनवर (जीए ०६ डी ७२११) झाड कोसळल्याने एक लाखापेक्षा अधिक रुपयांची हानी झाली.

(Major damage in Ponda taluka due to torrential rains)

Goa Rain Accident
पोलिस भरती प्रक्रिया नव्‍याने सुरू करा; विकास भगत यांची मागणी

फोंडा अग्निशामक दलाला यासंबंधी कळविल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन व्हॅनवरील झाड हटवले.

दुसरीकडे कोपरवाडा-कुर्टी येथे एका घरावर झाड कोसळल्याने नुकसान झाले. शिवाय बोरी, शिरोडा, तिस्क-उसगाव, बेतोडा तसेच अन्य ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळल्याने काही वेळ वाहतुकीत व्यत्यय आला. काही ठिकाणची झाडे अग्निशामक दलाने तर अन्य झाडे स्थानिकांनीच झाडे हटवून रस्ता मोकळा केला.

गेल्या चार दिवसांपासून ही पडझड सुरू आहे. त्यात शिरोडा येथे एका घरावर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले होते. शिवाय उसगाव येथे एक झाड वीजवाहिन्यांवर कोसळून खांब जमीनदोस्त झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दोन दिवसांच्या या घडामोडीनंतर आता पडझडीची मालिका सुरूच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com