Bori News : बोरीत गायक महेश काळेंची मैफिल रंगली!

Bori News : मुद्राप्रतिष्ठानच्या सिध्दनाथ स्पंदन पर्व सहामध्ये गायक काळे यांच्या स्वरयात्रेसह रंगमृंदग या प्रताप पाटील, कुणाल व भक्तराज पाटील यांच्या पखवाज वादनाच्या दुहेरी मैफली झाल्या.
Mahesh Kale Singer
Mahesh Kale SingerDainik Gomantak
Published on
Updated on

Bori News : बोरी, बोरीच्या सिध्दनाथ पर्वतावरील मंदिर परिसर गायक महेश काळे यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. भूप रागातील महादेव देव महेश्‍वरा या बंदिशीने त्यांनी आपल्या मैफलीची सुरुवात केली.

पुढे यमन रागाला जोडूनच नाट्यगीते व भक्तिगीते सादर केली. मुद्राप्रतिष्ठानच्या सिध्दनाथ स्पंदन पर्व सहामध्ये गायक काळे यांच्या स्वरयात्रेसह रंगमृंदग या प्रताप पाटील, कुणाल व भक्तराज पाटील यांच्या पखवाज वादनाच्या दुहेरी मैफली झाल्या.

शनिवारी सायंकाळी महेश काळे यांना ऐकण्यासाठी सिध्दनाथावर मोठ्या संख्येने श्रोतावर्ग उपस्थित होता. काळे यांनी भूप रागातील बंदिशीतून शिवआराधना करतानाच आपले लोकप्रिय असे मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया हे भक्तिगीत व त्यांच्या जोडीलाच सूर निरागस.. हो! गीत विविध अंगांनी आळविले.

Mahesh Kale Singer
Goa BJP: वास्‍को, मुरगावात विजयोत्‍सव; भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

गमृंदग या सत्रात विख्यात पखवाजवादक प्रताप पाटील, कुणाल पाटील व भक्तराज पाटील यांचे अप्रतिम व तेवढेच दमदार मृंदग वादन श्रोत्यांना भावले. नगमासाथ आकाश नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com