MGP Goa : ढवळीकरांकडून कार्यकर्त्यांचा विश्वासघात; कोटकरांकडून राजीनाम्याची मागणी

पक्ष घटनेनुसारच सर्व निर्णय : दीपक ढवळीकर
Deepak dhavalikar
Deepak dhavalikarDainik Gomantak

Maharashtrawadi Gomantak Party : मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिल्ली येथे होत असलेल्या ‘एनडीए’च्या बैठकीला उपस्थिती लावून पक्षातील कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला आहे. हा विश्वासघात आम्ही कदापि सहन करणार नाही, त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार तथा मगो चे एकनिष्ठ कार्यकर्ते परशुराम कोटकर यांनी केली आहे.

दुसरीकडे, पक्षाच्या घटनेनुसारच सर्व निर्णय घेतले जात असून केंद्रीय समिती वा कार्यकारिणीचीचे सदस्य नसलेल्यांना बैठक झाली की नाही, याची माहिती आमसभेवेळी मिळू शकेल, असे मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.

Deepak dhavalikar
निमित्त ठरले माकडाची उडी अन् शेजारी एकमेकांशी भिडले, प्रकरण पोलिसांत; म्हापशात नेमकं काय घडलं?

आतापर्यंत ढवळीकर बंधूनी केवळ मगो पक्षाचा स्वतःसाठी लाभ घेतला आहे. मगोपक्ष हा आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखे आजपर्यंत ते वागत आले. याचाच फायदा घेऊन ते ‘एनडीए’शी हात मिळवणीसाठी बैठकीस गेले, हा कार्यकर्त्यांचा विश्वासघात आहे. प्रायश्चित्त घेण्यासाठी दीपक ढवळीकर यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे कोटकर म्हणाले.

मामलेदारांचा निकष ढवळीकरांनाही !

लवू मामलेदार हे मगो पक्षात असताना त्यांनी अन्य राजकीय पक्षांशी संबंध ठेवले म्हणून पक्षाध्यक्ष ढवळीकर यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

दीपक ढवळीकर यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता एनडीए पक्षाशी हात मिळवणीसाठी ते दिल्लीला गेले. लवू मामलेदार यांना पक्षाध्यक्षांनी लावलेला निकष आता दीपक ढवळीकर यांनाही लागू होतो,असेही कोटकर म्हणाले.

Deepak dhavalikar
रोजगार विनिमय केंद्रामध्‍ये 1 लाख 20 हजार युवकांची नोंदणी : मुख्यमंत्री डॉ. सावंत

आमसभा घेऊ : परशुराम कोटकर

कुठलाही निर्णय पक्षाने घ्यायचा झाल्यास पक्षाची आमसभा किंवा कार्यकारिणी बैठक होणे तेवढेच गरजेचे असते. आतापर्यंत गेल्या सहा महिन्यांत पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आमसभा बोलावली नाही किंवा कुठल्याच कार्यकर्त्याला विश्वासात घेतले नाही. हा कार्यकर्त्यांचा अपमान आहे.

त्यामुळे अशा अध्यक्षांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करणेच योग्य होईल. ढवळीकर यांना पदावरून खाली खेचल्यानंतर सर्व सभासदांची आमसभा घेतली जाईल व पुढील अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय घेतला जाईल, असेही परशुराम कोटकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com