Virdhawal Khade: महाराष्ट्राचा अनुभवी जलतरणपटू वीरधवल खाडेची निवृत्तीची घोषणा

कारकिर्दीतील पहिले पदक जिंकलेल्या गोव्यातच घेतला निरोप
Virdhawal Khade
Virdhawal KhadeDainik Gomantak
Published on
Updated on

Virdhawal Khade Retirement: कारकिर्दीतील पहिले राष्ट्रीय पदक 2001 साली गोव्यातच जिंकले, आता याच राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकासह देशातील स्पर्धात्मक जलतरणातून निवृत्त होत असल्याची घोषणा महाराष्ट्राचा अनुभवी ऑलिंपियन जलतरणपटू वीरधवल खाडे याने केली.

‘‘मी मनाने अजूनही तरुण आहे, परंतु शरीराला थकवा जाणवत असल्याचे मला वाटते,’’ असे सांगत वीरधवलने निवृत्ती जाहीर केली. गोव्यात सध्या 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. कांपाल येथे स्पर्धेतील जलतरणात वीरधवल याने मंगळवारी संध्याकाळी पुरुषांच्या 50 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.

त्याने नोंदविलेली 22.82 सेकंद ही स्पर्धेतील विक्रमी ठरली. महिलांच्या 50 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत वीरधवलची पत्नी ऋतुजा खाडे हिनेही सुवर्णपदक जिंकताना 26.42 सेकंद अशी नवा स्पर्धा विक्रम नोंदविला. खाडे दांपत्याचे हे यश लक्षवेधी ठरले.

Virdhawal Khade
Goa Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पाला गोवा सरकारचा न्यायालयाबाहेर विरोध; न्यायालयात मात्र बोटचेपी भूमिका

वयाच्या 32 व्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर वीरधवल समाधानाने निवृत्त होऊ इच्छित आहे. ‘‘माझी ही भारतातील शेवटची स्पर्धा आहे. कधीतरी तुम्ही मला प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहू शकाल. मात्र ही माझी शेवटची स्पर्धात्मक स्पर्धा आहे हे निश्चित,’’ असे वीरधवलने सांगितले.

भारतीय जलतरणात तो ‘वीर’ या नावाने ओळखला जातो. दुखापतीतून सावरत असताना त्याने मुंबईत नवोदितांना मार्गदर्शन केलेले आहे, त्या अनुभवाच्या जोरावर तो आता प्रशिक्षक बनू इच्छितो.

कारकिर्दीतील वर्तुळ पूर्ण

‘‘2001 साली गोव्यातील मडगाव येथे ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मी पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर मी कितीतरी राष्ट्रीय पदके जिंकली, नवे विक्रम प्रस्थापित केले. आता कारकिर्दीतील वर्तुळ पूर्ण होत आहे.

गोव्यातच झालेल्या माझ्या शेवटच्या राष्ट्रीय स्पर्धेत मी सुवर्णपदक जिंकले आहे,’’ असे सांगत वीरधवलने स्पर्धात्मक निवृत्तीचा इरादा स्पष्ट केला. महाराष्ट्रासाठी पदक जिंकणे नेहमीच आपल्यासाठी खास ठरल्याचे त्याने नमूद केले.

Virdhawal Khade
Goa Ferry Boat: फेरीबोटीमध्ये दुचाकी-चारचाकीला तिकिट; मासिक पासचीही सुविधा

आशियाई पदक विजेता आणि ऑलिंपियन

वीर याने 2010 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 मीटर बटरफ्लाय शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. तेव्हा तब्बल २४ वर्षांनंतर भारताला एशियाड जलतरणात पदक मिळाले होते.

वीरधवल 2008 साली बीजिंग ऑलिंपिकमध्येही सहभागी झाला होता, तेव्हा तो ऑलिंपिक खेळणारा सर्वांत युवा भारतीय जलतरणपटू ठरला होता. त्यानंतर 2018 साली जबरदस्त पुनरागमन करताना टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविली.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे कोल्हापूरच्या या जलतरणपटूस कारकिर्दीतील अत्युच्च शिखरावर असताना जलतरणापासून दूर राहावे लागले होते, मात्र दृढनिश्चयाच्या बळावर तो पुन्हा जलतरण तलावात उतरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com