Calangute News : महाराष्ट्रातील पर्यटकावर कळंगुट समुद्रकिनारी हल्ला, मोबाईलची चोरी; पाच संशयितांना अटक

कळंगुट पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
Calangute Police Arrested Accused
Calangute Police Arrested AccusedDainik Gomantak

Maharashtra Tourist Assaulted By Unknown Culprit’s At Calangute Beach: कळंगुट समुद्रकिनारी एका महाराष्ट्रातील पर्यटकावर व त्याच्या भावावर अज्ञातांनी हल्ला करीत त्यांचे मोबाईल चोरी केल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी पाच परप्रांतिय संशयितांना अटक केली आहे. कळंगुट पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Calangute Police Arrested Accused
छत्रपती शिवराय, गोवा आणि वाद; दोन महिन्यात तीन तर एका वर्षांत धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पाच घटना

कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कळंगुट समुद्रकिनारी काही अज्ञातांनी आपल्यावर व भावावर हल्ला करुन मोबाईल फोन चोरल्याची तक्रार मुंबईतील एका पर्यटकाने कळंगुट पोलिस स्थानकात दाखल केली होती.

या तक्रारीच्या आधारे कळंगुट पोलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल प्रशांत चोपडकर, विद्यानंद आमोणकर, पोलिस कॉन्स्टेबल विजय नाईक, अमीर गरड, मयूर गावडे आणि प्रितेश किनलेकर यांच्या पथकाने प्रकरणाचा तपास करीत पाच संशयितांना ताब्यात घेतले.

Calangute Police Arrested Accused
MLA Pravin Arlekar यांची सरकारी कार्यालयांना अचानक भेट

संशयितांची कसुन चौकशी केली असता तक्रारदाराला मारहाण केल्याचे तसेच कळंगुट समुद्रकिनारी मोबाईल हिसकावून घेतल्याचे त्यांनी कबूल केले. याप्रकरणी संशयित विनोद चव्हाण, अभिषेक राठोड, सतीश राठोड, प्रेम थापा, मोहन मंडल सर्व रा. कळंगुट यांना अटक करण्यात आली.

एसडीओपी पर्वरी विश्वेश कर्पे आणि कळंगुट पोलिस स्थानकाचे पीआय परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रशांत चोपडेकर हे पुढील तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com