Chhatrapati Shivaji Maharaj Statue: छत्रपती शिवराय, गोवा आणि वाद; दोन महिन्यात तीन तर एका वर्षांत धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पाच घटना

मागील एका वर्षाच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण करणाऱ्या एकूण पाच घटना घडल्या.
Crisis related to Chhatrapati Shivaji Maharaj in Goa from Last on year
Crisis related to Chhatrapati Shivaji Maharaj in Goa from Last on yearDainik Gomantak

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Desecration in Goa: अखंड भारताचे श्रद्धस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्यावरून गोव्यात मागील दोन महिन्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तीन घटना घडल्या तर, गेल्या वर्षअखेरीस अशा दोन घटना समोर आल्या होत्या.

एका वर्षाच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण करणाऱ्या एकूण पाच घटना घडल्या.

या घटनांमुळे राज्यात धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या दोन महिन्यात झालेल्या घटनांचे पडसाद राज्यभरात आणि याचकाळात सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात देखील उमटले.

वाद नेमके कशामुळे झाले आणि वादानंतर परिस्थिती कशी होती याचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.

मागील दोन महिन्यातील घटना

1) कळंगुट येथील पुतळ्यावरून वाद

कळंगुट-साळगाव रस्त्यावर शिवस्वराज्य संस्था कळंगुट यांच्या वतीने अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. 3 जून 2023 रोजी रात्री संस्थेकडून हा पुतळा उभारण्यात आला.

पण, पुतळा तात्काळ हटविण्यात यावा असे 19 जून रोजी पंचायतीच्या वतीने संस्थेला निर्देश देण्यात आले. आदेशाची प्रत म्हापसा साबांखा कार्यकारी अभियंता तसेच गोवा राज्य पायाभूत सुविधा महामंडळास पाठविली गेली.

नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्या दुवशी (20 जून) शिवप्रेमींनी कळंगुट पंचायतीसमोर एकत्र येण्यास सुरूवात केली. पंचायतीचे सरपंच जोसेफ सिक्वेरा जोपर्यंत माफी मागत नाहीत.

तोवर माघार नाही असा पवित्रा शिवप्रेमींनी घेतला आणि पंचायतीला घेराव घातला. मोठ्या प्रमाणावर एकत्र आलेल्या शिवप्रेमींनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण तंग झाले होते.

जमाव पांगवण्यासाठी येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दिवसभर जमावाच्या आक्रमक भूमिकेपुढे अखेर सरपंच सिक्वेरा यांना नमते घ्यावे लागले आणि सायंकाळी त्यांनी पंचायतीच्या समोर येत शिवप्रेमींच्या भावना दुखवल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue At Calangute
Chhatrapati Shivaji Maharaj Statue At CalanguteDainik Gomantak
Crisis related to Chhatrapati Shivaji Maharaj in Goa from Last on year
Chatrapati Shivaji Maharaj : कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 10 दिवसांत हटवा - कळंगुट पंचायत

2) फादर बोलमॅक्स यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे झालेला वाद

कळंगुट येथील वाद शांत होत असतानाच याच वादाचा संदर्भ देत चिखली येथील एसएफसी चर्चमध्ये उपदेश देत असताना ख्रिस्ती धर्मगुरू फादर बोलमॅक्स यांनी छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. 03 ऑगस्ट रोजी हे प्रकरण समोर आले.

'छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय हिरो पण देव नाहीत.' असे वक्तव्य फादर बोलमॅक्स यांनी केले. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.

बोलमॅक्स यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील शिवप्रेमी आक्रमक झाले आणि सर्वात पहिल्यांदा काणकोण पोलिसांत तक्रार दाखल झाली.

04 ऑगस्ट रोजी राज्यभरातील शिवप्रेमींनी वास्को पोलीस स्थानकाबाहेर गर्दी करत बोलमॅक्स यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली.

जमावाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर रात्री उशीरा शिवप्रेमींची भावना दुखावल्याप्रकरणी बोलमॅक्स यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी (05 ऑगस्ट) बोलमॅक्स यांनी जामिनासाठी मडगाव जिल्हा न्यायालयात धाव घेतली.

तथापि, सोमवारी मडगाव जिल्हा न्यायालयाने त्यांना अंतरिम जामिन नाकारला. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी त्यांना दिलासा मिळाला व न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.

बोलमॅक्स यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात तर उमटलेच शिवाय त्याचवेळी सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटले. बोलमॅक्स यांच्या समर्थनात ख्रिस्ती बांधवांनी देखील टॉर्च दाखवत आंदोलन केले.

Father Bolmax Pereira
Father Bolmax PereiraDainik Gomantak
Crisis related to Chhatrapati Shivaji Maharaj in Goa from Last on year
Chatrapati Shivaji Maharaj : कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 10 दिवसांत हटवा - कळंगुट पंचायत

3) करासवाडा-आकय येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना

फादर बोलमॅक्स यांचे प्रकरण शांत होत असतानाच 14 ऑगस्ट म्हापसा येथील करासवाडा-आकय येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली. या घटनांचे पडसाद राज्यभरात दिसून आले.

मुख्यमंत्री, मंत्री ते विरोधी पक्षातील आमदारांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत दोषींवर कारवाईची मागणी केली.

म्हापसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरूवात केली.

शिवप्रेमींनी त्याच जागी त्याच दिवशी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना करण्याचा निर्धार केला. आणि मंत्री सुभाष फळदेसाई व आमदार कार्लुस फेरेरा यांच्या उपस्थितीत सायंकाळी शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली.

गृहखात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश उत्तर गोवा पोलिसांना देण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj statue at Karaswad Akoi Mapusa
Chhatrapati Shivaji Maharaj statue at Karaswad Akoi MapusaDainik Gomantak
Crisis related to Chhatrapati Shivaji Maharaj in Goa from Last on year
Chatrapati Shivaji Maharaj : कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 10 दिवसांत हटवा - कळंगुट पंचायत

मागील वर्षातील दोन घटना

1) साखळीतील घटना

ऑक्टोबर 2022 मध्ये ऊरस निमित्ताने साखळीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी एका परप्रांतिय तरूणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हिरवा झेंडा फडकावला.

या घटनेचा व्हिडिओ काही जणांनी चित्रित केला त्यानंतर तो समाज माध्यमांवर व्हायरल झाला.

शिवप्रेमींनी तरूणाला शोधून काढत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणले व माफी मागायला लावली. तरूणाला नाक रगडून महाराजांची माफी मागायला लावल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

2) खुरसावाडो-दिवाडी येथील घटना

महिन्यात खुरसावाडो-दिवाडी येथे 16 डिसेंबर 2022 रोजी अज्ञातांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील तलवारीची नासधूस करण्यात आली. या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गावकऱ्यांनी ओल्ड गोवा (Old Goa) पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी देखील याप्रकरणी दखल घेतली असून, घटनास्थळी जाऊन पुतळ्याची पाहणी केली. घटनास्थळी काही दिवसांसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com