Agriculture
Agriculture Dainik Gomantak

Belgaum: बेनकनहळ्ळीत शेतजमिनीच्या वादातून तुफान मारहाण

Belgaum: दोन गटांत सात जखमी; बेनकनहळ्ळीत शेतजमिनीचा वाद
Published on

Belgaum: शेतजमिनीवर अतिक्रमण केल्याने विचारणा करण्यासाठी गेलेल्या बेनकनहळ्ळीतील चौघावर विळ्याने प्राणघातक हल्ला करण्‍यात आला. यावेळी त्यांनी आपला बचावासाठी हल्लेखोरावरही प्रतिहल्ला केल्याने दुसऱ्या गटातीलही तिघे जण जखमी झाले.

सोमवारी दुपारी एकच्या दरम्यान, सावगाव येथील अंगडी महाविद्यालयानजिक ही घटना घडली. याप्रकणी बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यल्लाप्पा महादेव पाटील, कृष्णा महादेव पाटील, परशराम महादेव पाटील, शोभा बसवंत तारिहाळकर (चौघेही रा. बेनकनहळ्ळी) अशी पहिल्या गटातील जखमींची नावं आहेत. तर दुसऱ्या गटातील श्रीकांत नारायण पाटील, अर्जुन विठ्ठल कोळे, राजू श्रीकांत पाटील (तिघेही रा. अंगडी कॉलेजनिक, सावगाव रोड) देखील जखमी झाले आहेत.

सर्वांना उपचासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहिल्या गटातील यल्लाप्पा पाटील यांच्या छातीवर विळ्याचा वर्मी घाव बसल्याने त्यांना अधिक उपचासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 Agriculture
Illegal Sand Extraction : पोलिस गस्त असूनही रेती उत्खनन सुरूच

कंपाऊंडचा काही भाग अतिक्रमण करत आपल्या हद्दीत बांधण्यात आल्याचा आरोप करत याबाबत विचारणा करण्यासाठी यल्लाप्पा आपल्या नातेवाईकासह आज शेतावर गेले होते. त्यावेळी विचारणा करत असताना दोन्ही गटामध्ये वादावादी सुरु झाली.

घराच्‍या कंपाऊंडवरून वाद

बेनकनहळ्ळी येथील यल्लाप्पा पाटील यांची सावगाव येथील अंगडी महाविद्यालयानजिक शेतजमीन आहे, तर त्या ठिकाणी दुसऱ्या गटातील श्रीकांत पाटील यांनी नवीन घर बांधले असून, घराभोवती ते कंपाऊंड बांधत आहेत. याच्‍यावरूनच वाद सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com