
Nagpur-Goa Shaktipeeth Highway
पणजी: गोवा-नागपूर शक्तिपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र सरकार पुरेसे गंभीर असल्याचे काल (३ मार्च) दिसून आले. महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेला संयुक्तपणे संबोधित करताना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी अभिभाषणात या महामार्गाचा उल्लेख केला.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही, राज्यपाल राधाकृष्णन यांनी आज स्पष्ट केले की प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ एक्सप्रेस-वेचे काम लवकरच सुरू होणार आहे.
त्यांनी सांगितले की, ८०२ किलोमीटर लांबीचा हा हरित प्रकल्प सुमारे ८६ हजार ३०० कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. हा प्रस्तावित रस्ता विविध धार्मिक तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे, मात्र विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमावण्याची भीती वाटत आहे.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले, की हा महामार्ग सर्वांच्या विश्वासात घेऊन पूर्ण केला जाईल.
तो मार्गातील महत्त्वाच्या धार्मिक व तीर्थक्षेत्रांना जोडेल. हा महामार्ग केवळ प्रवासाचा वेळ कमी करणार नाही, तर या भागाचा आर्थिक विकासही साधेल.
राज्यपालांनी असेही सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजनांअंतर्गत सरकार ७,४८० किमी लांबीचे रस्ते सिमेंट-काँक्रिटने बांधणार आहे. ही तंत्रज्ञानयुक्त पद्धत रस्त्यांची टिकाऊपणा वाढवेल, वाहतूक अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनेल.
शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारपासून सुरू होईल आणि गोव्यातील पत्रादेवी येथे तो राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.