Mapusa Hospital
Mapusa HospitalDainik Gomantak

Mapusa Hospital: म्हापसा जिल्हा रुग्णालयात व्यसनमुक्ती विभाग सुरु

म्हापसा जिल्हा रुग्णालयात नवीन व्यसनमुक्ती उपचार सुविधेचे उद्घाटन झाले.
Published on

Mapusa Hospital: जिल्हा इस्पितळात नवीन व्यसनमुक्ती उपचार सुविधेचे उद्घाटन झाले. केंद्र सरकारच्या नशा मुक्त भारत अभियमानअंतर्गत उत्तर जिल्हा इस्पितळातील हे व्यसनमुक्ती सुविधा (एटीएफ) गुरुवारी राष्ट्राला समर्पित करण्यात आले.

म्हापशातील उत्तर जिल्हा इस्पितळात व्यसनमुक्ती उपचार सुविधा जानेवारी 2022पासून कार्यरत आहे आणि 1500हून अधिक रुग्णांवर उपचार केलेत. हे केंद्र आरोग्य सेवा संचालनालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आहे.

भारत सरकारने नशा मुक्त भारत अभियानच्या पुढाकाराने गुरुवारी 25 व्यसनमुक्ती उपचार सुविधा राष्ट्राला समर्पित केल्या आहेत. ज्यात उत्तर जिल्हा इस्पितळातील व्यसनमुक्ती उपचार सुविधांचा समावेश आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार तसेच गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी गुरुवारी डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात 25 व्यसनमुक्ती उपचार सुविधांची तुकडी राष्ट्राला समर्पित केली.

समारंभात देशभरातील एटीएफ केंद्रे आभासी कार्यक्रमारित्या समर्पित करण्यात आली. ज्यात पेडे येथील उत्तर जिल्हा इस्पितळाच्या केंद्राचा समावेश आहे.

Mapusa Hospital
Goa News: आभिमानास्पद ! आशियातील सर्वात मोठ्या भारत रंग महोत्सवात गोव्यातील नाटकांचा डंका

उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, डॉ. वंदना धुमे, उत्तर जिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश धुमे, डॉ. शाहीन सैय्यद व इतर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्यांनी नशामुक्त अभियानांतर्गत शपथ घेतली.

पेडे येथील जिल्हा इस्पितळात व्यसनमुक्ती उपचार सुविधा जानेवारी 2022मध्ये सार्वजनिक हितासाठी उघडण्यात आली होती आणि 1500हून अधिक लोकांना सेवा देत आहे ज्यांना विविध व्यसनमुक्तीसाठी मदत केली जाते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com