Eknath Shinde: म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, म्हादई लढ्यात गोव्याला...

एकनाथ शिंदे : गोवा-महाराष्ट्र हे भाऊ-भाऊ
Eknath Shinde
Eknath ShindeDainik Gomantak
Published on
Updated on

Eknath Shinde गोवा आणि महाराष्ट्र ही राज्ये भाऊ-भाऊ आहेत. म्हादई नदीच्या पाण्यासाठीचा लढा हा तीन राज्यांचा प्रश्न असला तरी हा लढा कर्नाटकच्या विरोधात महाराष्ट्र आणि गोवा एकत्रित लढतील, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आज मुंबईत केले.

महाराष्ट्रातील तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासह पाटबंधारे आणि जलस्रोत खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Eknath Shinde
Rise In Vegetable Price: भाजीपाला महागला; बिन्स खातेय भाव, टोमॅटोही झाले आंबट

सुमारे एका दशकाच्या कालखंडानंतर या नियंत्रण मंडळाची बैठक झाली.यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गोवा आणि महाराष्ट्राचे नाते भावांसारखे आहे. कर्नाटकविरोधात म्हादईच्या पाण्यासाठीचा लढा गोवा आणि महाराष्ट्र एकत्रित मिळून लढतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com