Goa Shigmotsav 2023 : धारबांदोडा चित्ररथ स्पर्धेत ‘महालक्ष्मी बांदोडा’ प्रथम

लहानगट वेशभूषा स्पर्धेत अंतरा शेंडकरला पहिले बक्षीस, दुसरे सृष्टी देसाई तर तिसरे वनिश देसाई यांना बक्षिसे प्राप्त
Goa Shigmotsav 2023
Goa Shigmotsav 2023Dainik Gomantak

Goa Shigmotsav 2023 : धारबांदोडा शिगमोत्सवातील मोले येथे झालेल्या चित्ररथ स्पर्धेत पहिले बक्षीस महालक्ष्मी नागरिक समिती बांदोडा, दुसरे त्रिवेणी कला संघ दुर्भाट-फोंडा, तिसरे श्री देवदडेश्वर कल्चरल स्पोर्ट्‌स क्लब नेरूल, चौथे बक्षीस धाडसखल स्टार्स माशेल, पाचवे कुंभारजुवा नागरिक समिती यांना मिळाले.

तर उत्तेजनार्थ पहिले बक्षीस शांतादुर्गा म्हारुदेव प्रतिष्ठान, दुसरे रेकेम युथ असोसिएशन, तिसरे दामोदर महालक्ष्मी कला संघ उंडीर, चौथे साई रवळनाथ बाल मंडळ कवळे, पाचवे गजानंद कला मंडळ कपिलेश्वरी फोंडा, सहावे भगत बॉइज उंडीर-फोंडा तर सातवे उत्तेजनार्थ बक्षीस श्री दामोदर प्रसन्न मडगाव यांना मिळाले.

Goa Shigmotsav 2023
Padma Awards 2023: माजी केंद्रीय मंत्री एसएम कृष्णा यांना पद्मविभूषण तर बिर्ला यांना पद्मभूषण, वाचा संपूर्ण यादी

रोमटामेळ स्पर्धेत सुयोग शिगमोत्सव मंडळ आडपई यांना पहिले, कुडचडे काकोडा शिगमोत्सव समिती यांना दुसरे, खांडेपार शिगमोत्सव मंडळ यांना तिसरे तर चौथे बक्षीस सावर्डे शिगमोत्सव मंडळ यांना मिळाले.

लोकनृत्य स्पर्धेत पहिले बक्षीस सरस्वती कला मंडळ कुर्टी-फोंडा, दुसरे सिद्धिविनायक म्हालसा कला संघ म्हार्दोळ, तिसरे सावईवेरेचो सख्याहरी, चौथे श्री नवदुर्गा कला आणि सांस्कृतिक मडकई, पाचवे श्री घडवंश लोकमांड केरी-सत्तरी यांना मिळाली.

Goa Shigmotsav 2023
Margao News : लोहिया मैदान ऐतिहासिक स्थळ व्‍हावे...

उत्तेजनार्थ पहिले बक्षीस विजया कला मंडळ कुर्टी-फोंडा, दुसरे श्री शांतादुर्गा कला मंडळ फोंडा, तिसरे श्री महादेव सेल्फ हेल्प ग्रुप मडकई, चौथे केळबाई सेल्फ हेल्प ग्रुप झरीवाडा-मोले, पाचवे एकता सेल्फ हेल्प ग्रुप कासावली-मोले, सहावे अतुला महादेव सेल्फ हेल्प ग्रुप झरीवाडा-मोले तर सातवे उत्तेजनार्थ बक्षीस पाईकदेव नंद्रण-मोले यांना मिळाले.

लहानगट वेशभूषा स्पर्धेत अंतरा शेंडकरला पहिले बक्षीस, दुसरे सृष्टी देसाई तर तिसरे वनिश देसाई यांना बक्षिसे प्राप्त झाली. सिनियर गट वेशभूषा स्पर्धेत पहिले बक्षीस मदन तारी (कांतरा १) यांना, दुसरे बक्षीस योगीराज गावकर (विठ्ठल), तिसरे विजय देसाई (लाल बहादूर शास्त्री), चौथे धनंजय नाईक (कांतरा २) तर पाचवे बक्षीस शिवा नाईक (काली मॉं) यांना प्राप्त झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com