Mahadev Betting App: 100 कोटींहून अधिकचे व्यवहार, 30 लाख गोठवले, 25 लाख जप्त; गोव्यात सात बुकींना अटक

Mahadev Betting App Scam: महाराष्ट्र, छत्तीसगड आणि हरियाणातील येथील आरोपींनी गोव्यातून अटक.
Mahadev Betting App: 100 कोटींहून अधिकचे व्यवहार, 30 लाख गोठवले, 25 लाख जप्त; गोव्यात सात बुकींना अटक
Mahadev App Betting Scam: 25 lakh seized from 7 Accussed Arrested By Chhattisgarh Police in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छत्तीसगड पोलिसांनी पर्दाफाश केला. सर्वप्रथम एका स्थानिक बुकीला अटक करुन त्यानंतर सांकवाळसह इतर ठिकानी पोलिसांनी छापेमारी केली.

पोलिसांनी सात बुकींना अटक करत कोरबा, छत्तीसगड येथे घेऊन गेले. यामध्ये चार आरोपी छत्तीसगड, दोन महाराष्ट्र आणि एक हरियाणाचा आहे. यात महादेव ॲपशी देखील आरोपीचे कनेक्शन असल्याची पुष्टी झाली आहे.

Mahadev Betting App: 100 कोटींहून अधिकचे व्यवहार, 30 लाख गोठवले, 25 लाख जप्त; गोव्यात सात बुकींना अटक
Morjim Beach : किनारपट्टीवर नशेचे सावट गडद ; युवापिढी संकटात

छत्तीसगड पोलिसांनी ऑनलाइन सट्टा प्रकरणी प्रतीक विध्वानी याला रंगेहात पकडले होते. त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान अनेक बँकांच्या खात्यांद्वारे लोकांशी पैशाचे व्यवहार आणि मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप तयार केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या विविध बँक खात्यांमध्ये 1.70 कोटी रुपयांचे व्यवहार आढळून आले.

अटक केलेल्या बुकीकडे चौकशी केली असता, त्याचे संघटित टोळीचे साथीदार गोव्यात बसून महादेव ॲप पॅनलच्या माध्यमातून बेटिंगचे नेटवर्क चालवत असल्याचे उघड झाले.

मनीष अमरलाल उदाषी (36, रायपूर-छत्तीसगड), मधुर सेवल वलेचा (22, रायपूर-छत्तीसगड), नारायण बहरिकराम निषाद (23, रायपूर-छत्तीसगड, टिकेंद्र हीरामनलाल मांडवी (25, दुर्ग-छत्तीसगड), दिनेश दिलीप वासवानी (30, नागपूर-महाराष्ट्र), सौरभ नरेश मनुज (22, वर्धा-महाराष्ट्र) आणि कुलदीप शमशेर सिंग (22, फतेहबाद-हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्या बुकींचे नावे आहेत.

अटक करण्यात आलेल्या सात आरोपींकडून पोलिसांनी बेटिंगमध्ये वापरलेले 13 लॅपटॉप, एकूण 25 लाख रुपये किमतीचे 48 मोबाईल, 26 वेगवेगळ्या बँकांचे पासबुक, 14 वेगवेगळ्या बँकांचे धनादेश आणि 40 एटीएम कार्डे जप्त केली आहेत.

तपासादरम्यान विविध बँकांच्या एकूण 84 खात्यांतील 30 लाख रुपये गोठवण्यात आलेत. त्या बँक खात्यांमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिकचे व्यवहार आढळून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com