Morjim Beach : किनारपट्टीवर नशेचे सावट गडद ; युवापिढी संकटात

Morjim Beach : परंतु आज या व्यावसायात अनेक अपप्रवृत्तींचाही शिरकाव झाला आहे. त्यामुळे अनेकांचे आयुष्य बरबादही होत आहे. विशेषतः किनारपट्टीतील युवापिढी यात भरडली जात असल्याचे दिसून येत आहे.
Morjim Beach
Morjim Beach Dainik Gomantak
Published on
Updated on

Morjim Beach :

मोरजी, राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय गोव्याच्या अर्थ व्यवस्थेचा मोठा आधार ठरला. पर्यटनाशी निगडित छोटे मोठे व्यवसायावर अनेकजण आपले पोट भरतात. हॉटेल, क्लब, रेस्टॉरंट आदी ठिकाणी शेकडो लोकांना रोजगारही मिळतो.

परंतु आज या व्यावसायात अनेक अपप्रवृत्तींचाही शिरकाव झाला आहे. त्यामुळे अनेकांचे आयुष्य बरबादही होत आहे. विशेषतः किनारपट्टीतील युवापिढी यात भरडली जात असल्याचे दिसून येत आहे.

पर्यटन व्यवसायाने किनारपट्टीला आर्थिक सुबत्ता दिली असली, तरी त्यातून काही नवे प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. एकीकडे पर्यटन व्यावसायात जीवघेणी व्यावसायिक स्पर्धा सुरू आहे. पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरमार्गाचाही अवलंब करण्यात येतो.

किनारपट्टीवर परप्रांतीयांचा कब्जा

परप्रांतीय व्यावसायिकांनी किनारपट्टीवर केलेला कब्जा तसेच अतिक्रमण हे आता स्थानिकांसाठीही चिंतेची गोष्ट ठरली आहे. अनेक स्थानिकांनीच आपल्या जागा परप्रांतीयांना विकल्या किंवा भाडेपट्टीवर दिल्या आहेत. त्यामुळे परप्रांतीयांचे वर्चस्व वाढले आहे.

Morjim Beach
Goa's Top News: अपघात, टॅक्सी चालकाला मारहाण; गोव्यातील ठळक बातम्यांचा आढावा

गैरप्रवृत्तींचा शिरकाव

पर्यटन व्यावसायात आता गैरप्रवृत्तींचा शिरकाव आता मोठ्या प्रमाणात झाला आहे. जमीन माफियांपासून ड्रग्ज माफियांची एक साखळी किनारपट्टीत समांतर अर्थ व्यवस्था चालवत असल्याचेही दिसून येते. व्यावसायिक स्पर्धाही जीवघेणी होत चालली आहे. पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यासाठी किंवा लुभावण्यासाठी गैरप्रकारांचा आधार घेतला जातो. टुरिस्ट गाईड्‍स ऐवजी दलालांची एक मोठी फौज किनारपट्टीत सक्रिय असल्याचे दिसून येते.

ड्रग्जचा विळखा :

पर्यटन व्यवसायाला पडलेला ड्रग्जचा विळखा कोणापासून लपून नाही. ड्रग्ज माफिया एक समांतर अर्थव्यवस्था किनारपट्टीत चालवतात. बक्कळ पैसा मिळत असल्याने अनेकजण यात गुरफटतात आणि त्या व्यवस्थेचा एक भाग होतात. किनारपट्टीत चाललेल्या ड्रग्ज व्यवसायाबाबत सरकार अनभिन्न नाही, सरकारी यंत्रणांचेही हितसंबंध यात गुंतलेले असतात त्यामुळे चुटपूट कारवायांपलिकडे विशेष काही होत नाही. पकडले जातात ते छोटे पेडलर, कुणी ड्रग्ज माफियाला पकडला गेल्याची घटना विरळच आहे.

संगीत रजनींचा भुलभुलैया...

किनारी भागात पर्यटकांना लुभावण्यासाठी मोठ्या प्रमाणात संगीत रजनींचे आयोजन केले जाते. परंतु हाही एक भुलभुलैया असून या संगीत रजनी आयोजनामागेही ड्रग्ज रॅकेटच सक्रिय असते. सरकारी यंत्रणाही या विरोधात कोणती कारवाई करताना दिसत नाही. या विरोधात कोणी आवाज उठवला तर त्यांची तोंडे बंद केली जातात किंवा त्यांच्या मागे यंत्रणाच हात धुवून लागतात हे आजवर अनेकदा दिसून आले आहे.

झटपट पैसा मिळवण्याचा हव्यास...

किनारपट्टीतील युवा पिढी आज मोठ्या संकटात आहे. एकीकडे बेरोजगारी आणि दुसरीकडे पर्यटन क्षेत्रातील भुलभुलैया यात ही पिढी भरडली जात आहे. झटपट पैसा मिळवण्याच्या नादात अनेकजण गैरप्रकारात गुंततात आणि आपल्या आयुष्याचे वाटोळे करून घेतात. ड्रग्ज माफियांनी बेरोजगार युवा पिढीला आपल्या कवेत घेतले आहे, त्यामुळे पालकही आज चिंतेत दिसून येत आहेत.

सरकार पर्यटन व्यवसायाला पाठबळ देण्यास असफल ठरलेले आहे. पर्यटन धोरणात अनेक त्रुटी आहेत. पर्यटन व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलणे आवश्‍यक आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल.

— ॲड. अमित सावंत, माजी सरपंच मांद्रे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com