Panjim Smart City : पणजी महापालिका कार्यक्षेत्रात सध्या स्मार्ट सिटी मिशन तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत कामे सुरू आहेत. ही कामे 15 मार्चपर्यंत चालतील, त्यानंतर ती बंद केली जातील अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.
‘जी-२०’ बैठकांच्या आयोजनाचा मान यंदा भारताला मिळाला आहे. या बैठकांपैकी एक बैठक गोव्यात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात तयारी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे पणजी शहरात मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे पणजी स्मार्ट सिटीच्या युनिव्हर्सल रोडचे काम सुरू आहे. या कामांमुळे जागोजागी खड्डे खणण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, पणजी शहर परिसरात सर्वत्र स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकारची कामे सुरू आहेत. मात्र, एक ना धड आणि भाराभर चिंध्या, अशा प्रकारची अवस्था शहर परिसरात सुरू असलेल्या कामांची झालेली आहे. जीव मुठीत घेऊन नागरिकांना ये-जा करावे लागत असल्याचे चित्र आहे.
रस्त्याच्या खोदकामांमुळे पार्किंगसाठीदेखील जागा नाही. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना तरी घरातून बाहेर पडेणेदेखील अशक्यप्राय होऊन बसले आहे. त्यामुळे पणजीतील नागरिक महापालिकेच्या या अपरिपक्व नियोजनाबद्दल प्रचंड चीड व्यक्त करत आहेत. हा सर्व प्रकार आणि त्रास केवळ आणि केवळ नियोजनाच्या अभावामुळे होत असल्याची चीड नागरिक व्यक्त करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.