Mahadayi Water Dispute : गोव्यातील 'या' मंत्र्यांनी अमित शहांच्‍या वक्‍तव्‍याचा नोंदवला निषेध

म्‍हादई प्रश्‍‍नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर मौन बाळगलेल्या मंत्र्यांनी आता आक्रमक होत गोव्याचा स्वाभिमान जपला आहे.
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute : ‘गोव्याच्या संमतीनेच म्हादईचे पाणी कर्नाटकाला देण्याचा निर्णय झाला आहे’, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर मौन बाळगलेल्या मंत्र्यांनी आता आक्रमक होत आपला स्वाभिमान जपला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी काल शहांच्या वक्तव्याचा निषेध केला;

तर जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी शहांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली. दुसरीकडे काही मंत्री हे माध्यमांना चुकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोग्‍यमंत्री राणे यांनी सदर प्रकरणी उत्तरासाठी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवले आहे.

कळसा भांडुरा प्रकल्पातील म्हादईचे पाणी वळवण्यासाठीच्या कर्नाटकाच्या सुधारित प्रकल्प आराखड्याला केंद्रीय जल आयोगाने मंजुरी देत पाणी वळवण्यास अनुमती दिली.

यानंतर कर्नाटकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या संमतीनेच म्हादईचे पाणी उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय झाला असून यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांना हे पाणी मिळेल, असे जाहीर केले.

यानंतर या जनक्षोभात आणि अक्रमकतेमध्ये भर पडली. रविवारच्या ग्रामसभांतून सरकारच्या निषेधाच्या ठरावांतून हुंकार ऐकायला मिळाला. तर आज माध्यम प्रतिनिधींनी राज्यातील मंत्र्यांना शहांच्या वक्तव्याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे येऊ लागली आहेत.

Mahadayi Water Dispute
Manohar International Airport: मोपा विमानतळावर लवकरच स्पाईसजेट कंपनी सुरु करणार विमान सेवा

नेमके काय घडले?

  • सकाळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यटन भवनमध्ये आले असता पत्रकारांच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याऐवजी त्यांनी दुसऱ्या दरवाजातून निघून जाणे पसंत केले.

  • आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे स्तन कर्करोगाच्या कार्यक्रमासाठी पणजी येथे उपस्थित होते. त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत सरकारचे मत मुख्यमंत्री डॉ. सावंत व्यक्त करतील, तुम्ही त्यांनाच विचारा असे सांगून विषय टोलवला.

  • केपेत साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनी ‘शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करतो’ असे जाहीर केले. म्हादईचा लढा बंद केला नसून तो सुरूच राहणार आहे. यासाठी आम्ही कोणतेही पाऊल उचलण्यास मागे पाहणार नाही, अशी हमी त्यांनी दिली.

  • मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमची न्यायालयीन बाजू भक्कम असल्याचे सांगितले. मात्र, शहा यांच्या वक्तव्यावर थेट भाष्य करणे टाळले. इतर मंत्री आक्रमकपणे बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

Mahadayi Water Dispute
Gauri Achari Case : संशयित गौरव बिद्रेला मारहाण प्रकरणी दोघा कैद्यांवर गुन्हा दाखल

सरकारवर विश्‍वास ठेवा : काब्राल

केपे : म्हादई विषयावर आमचे सरकार गंभीर आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेकडे लोकांमध्ये गैरसमज होऊ नये. जनतेने राज्य सरकारवर विश्‍वास ठेवावा व विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये, मत मंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केले.

‘म्हादईचे पाणी कर्नाटकात वळविण्याविषयी मंत्रिमंडळ बैठकीत कधीच निर्णय झाला नाही. उलटपक्षी आम्ही प्रत्येक बैठकीत विरोध दर्शविला. आम्ही गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, तेव्हादेखील पाणी वळविण्यास आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले होते,’ असे त्यांनी सांगितले.

विरोधकांकडून हल्लाबोल सुरूच

‘अमित शहा यांचे वक्तव्य आणि त्यानंतर मंत्र्यांकडून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया या केवळ ढोंग असून सरकारने म्हादई कर्नाटकला विकण्याचे पाप केले आहे’, असा घणाघात गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, ‘की म्हादईचे पाणी गोव्यालाच मिळणार यासाठी काँग्रेस पूर्वीपासून कटिबद्ध होते, हे आता सिद्ध झाले आहे. म्हादईसाठी आता केवळ लोकलढाच न्याय देऊ शकेल.’ तसेच आम आदमी पक्ष लोकांच्या समवेत असून सर्व प्रकारच्या आंदोलनात सहभागी असेल, असे आपचे नेते अमित पालेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com