Navelim Madrasa Fraud: नावेलीतील मदरशामध्ये आर्थिक गैरव्यवहार? संस्थापक सदस्याचा मडगाव पोलिसांत गंभीर आरोप; अध्यक्षांविरोधात तक्रार दाखल

Madrasa Ahle Sunnat Navelim Fraud: मोडडी-नावेली येथील मदरसा अहले सुन्नत अनवर ए रजा या संस्थेच्या कारभारात आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला.
Navelim madrasa fraud allegations
Navelim madrasa fraud allegationsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मोडडी-नावेली येथील मदरसा अहले सुन्नत अनवर ए रजा या संस्थेच्या कारभारात आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक झाल्याचा आरोप करत संस्थेचे संस्थापक सदस्य अब्दुल सत्तार यांनी बुधवारी मडगाव (Margao) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीत संस्थेचे अध्यक्ष मेहबूब कलहोली, रफिक हाथीमातुर, हुसेन कलहोली तसेच इतर समिती सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदार अब्दुल सत्तार यांच्या दाव्यानुसार, संस्थेच्या सुमारे ५० संस्थापक सदस्यांना अंधारात ठेवून विद्यमान समितीने बेकायदेशीरपणे संस्थेचा ताबा मिळवला आहे. समितीने बनावट कागदपत्रे तयार करून तसेच पोटनियमांचे उल्लंघन करून संस्थेची सूत्रे हाती घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक निधी आणि समाजबांधवांच्या पैशांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

Navelim madrasa fraud allegations
Navelim Panchayat: सखल भागात बांधकाम नको! नावेली पंचायत आक्रमक; 'बीडीओ'च्या विरोधात बंडाची तयारी

तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे मशिदीच्या आवारात अनधिकृत प्रवेश करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. समिती स्थापन करताना आवश्यक असलेली दोन तृतीयांश बहुमताची अट पाळली गेली नाही तसेच सदस्यांना कोणतीही नोटीस बजावण्यात आली नव्हती, असेही तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध तत्काळ दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Navelim madrasa fraud allegations
Navelim Truck Accident: चालकाचे नियंत्रण गेले, ट्रक घुसला घरात! छपरासह कुंपणाची मोडतोड; चालक जखमी

पोलिस प्रशासन सतर्क

गुरुवारी (ता. २८) सकाळी ७ वाजता मशिदीत बकरी ईदची नमाज होणार असून २९ मे रोजी शुक्रवारची नमाज पार पडणार आहे. संस्थेमध्ये सध्या दोन गट निर्माण झाले असून मशिदीच्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com