Goa Monsoon Update : गलथान नियोजनाचा प्रवाशांना मनस्ताप, मडगांव रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांकवर....

स्थानिक तसेच प्रवाशांत संताप ः गटारांची मान्सूनपूर्व साफसफाई न केल्याचा परिणाम
margaon railway station
margaon railway stationdainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon Update : राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरील गटारात पावसाचे पाणी तुंबले आहे. येथील गटारांचे योग्य नियोजन केले नसल्याने ही परिस्थिती येथे उद्‍भवल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांना येथे साचलेल्या पाण्यातूनच वाट काढत जावे लागत आहे. तसेच त्यांच्या आरोग्यालाही धोका उत्पन्न झाला आहे.

मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर आत जाण्यासाठी ही आडवाट असली तरी अनेक प्रवाशी मुख्य पदपूल सोडून या वाटेने ये जा करीत असत. मागील काळी बंद असलेले फाटक प्लॅटफॉर्म क्र. ६ रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामामुळे अवजड (ट्रक ) वाहनांना मालाची ने आण करण्यासाठी खुले करण्यात आले आहे.

margaon railway station
Madgaon Garbage : कचऱ्यामुळे त्रस्त माडेलवासीयांची निदर्शने; मडगाव पालिका कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याचा आरोप

या प्लॅटफॉर्मवर वास्को ते कुळे दरम्यान प्रवास करणारी स्थानिक रेल्वे थांबा घेत असते. तसेच इतर प्लॅटफॉर्मवर पराज्यातील रेल्वेची गर्दी असल्यास आपत्कालीन गरजेच्या वेळी या प्लॅटफॉर्मचा वापर लांब पल्ल्याच्या रेल्वेना थांबा घेण्यासाठी करण्यात येत असतो.

margaon railway station
Madgaon : कुंकळ्‍ळी युनायटेड हायस्कूलमध्ये ‘स्मार्ट क्लास रुम’ची सुविधा उपलब्ध

या तुंबलेल्या पाण्यामुळे प्रवाशांच्या तसेच स्थानिक दुकानदार व स्थानिक रहिवाशी यांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाला आहे त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी व येथील प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दाखल घ्यावी,अशी मागणी येथील रहिवाशी तसेच प्रवाशांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com