Madgaon : कुंकळ्‍ळी युनायटेड हायस्कूलमध्ये ‘स्मार्ट क्लास रुम’ची सुविधा उपलब्ध

मुलांसाठी पर्वणी : स्व. प्रभाकर वैद्य यांच्‍या स्‍मरणार्थ उपक्रम

Lok Sabha Speaker Om Birla inauguration Harishchandra Rama Naik house
Lok Sabha Speaker Om Birla inauguration Harishchandra Rama Naik houseGomantak Digital Team

Madgaon : कुंकळ्‍ळी एज्युकेशनल सोसायटीच्या (सीईएस) युनायटेड हायस्कूलमध्ये दोन स्मार्ट क्लासरूमची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचे उद्‌घाटन शैलेश प्रभाकर वैद्य यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाला पूरक असा हा उपक्रम आहे. पारंपरिक पद्धतीने अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इंटरनेट, टीव्ही, प्रोजेक्टर आदींचा वापर करून ‘लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन’चा चांगला लाभ मुलांना करून देता येईल.

चालू शैक्षणिक वर्षापासून मुलांसाठी ती एक पर्वणी ठरणार आहे. इयत्ता तिसरी व चौथी तसेच पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना शिक्षकांनी निदान महिन्यातून चार-पाच वेळा तरी अशी प्रात्यक्षिके दाखविण्यावर भर द्यावा, असे आवाहन वैद्य यांनी उद्‌घाटनप्रसंगी केले.

शैलेश वैद्य हे कुंकळ्‍ळी एज्युकेशनल सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असून त्यांचे वडील स्व. प्रभाकर वैद्य हे संस्थेचे माजी अध्यक्ष होते. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वैद्य यांनी स्मार्ट क्लास रूम, की-बोर्ड, लॅपटॉप सुविधा उपलब्ध केल्या आहेत.


Lok Sabha Speaker Om Birla inauguration Harishchandra Rama Naik house
Margao News : गोमंतकीयांच्या नोकऱ्यांसाठी कोकणी संस्‍था काय करतात?

उद्‌घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विदेश ऊर्फ वीरेंद्र देसाई, उपसचिव व व्यवस्थापक विवेक पडियार, सचिव प्रकाश देसाई, खजिनदार दिलीप देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय सावंत देसाई, युनायटेड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता सावंत यांची उपस्थिती होती.

भूगोल व इतर विषयांचे पारंपरिक पद्धतीने मुलांना शिक्षण दिले जाते. आपण इंटरनेटवर जंगल, प्राणी पक्षी अशा गोष्टी पाहत असतोच. याच गोष्टी जर तिसरी ते दहावीपर्यंतच्या मुलांना अधूनमधून या सुविधांमार्फत दाखविल्या, एखाद्या आयएस अधिकाऱ्याचे भाषण ऐकविले तर मुलांना महाविद्यालयीन पातळीवर त्याचा खूप लाभ होईल.

- शैलेश वैद्य, सदस्य, कुंकळ्‍ळी एज्युकेशनल सोसायटी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com